संगणकाचे आरोग्य कसे सांभाळाल?

संगणक आता माणसाच्या आयुष्यात केवळ एक मशिन रहिलेला नसुन आता तो एक मित्र किंबहुना कुटुंबातील एक सदस्य झालेला आहे. प्रत्येक काम हल्ली संगणकावर अवलंबुन असते. म्हणुनच संगणकाची काळजी घेणे आणि त्याची देखभाल करणे अत्यावश्यक झाले आहे -
आणि मित्रहो संगणकाची देखभाल करणे तितकेसे कठीण काम नाही. तुम्हाला तुमच्या प्रिय संगणकाची देखभाल करण्यासाठी उपयोगी पडणारया या काही टिप्स -

१. नविन प्रोग्राम्स डाउनलोड करताना विचार करा. बरयाच वेळा कम्प्युटर मध्ये होणरया बिघाडांचे मुख्य कारण काही चुकिच्या सॉफ़्ट्वेर्स चे इन्टरनेट वरुन डाउनलोड अथवा एखद्या चुकिच्या सीडी वरुन केलेले इन्स्टॉलेशन हे असते. बरयाच सॉफ़्ट्वेर्सच्या इन्स्टॉलेशनमुळे पीसी (कम्प्युटर) स्लो हॊउन जातो, तसेच व्हायरसचा धोका देखिल संभवतो. म्हणुनच सॉफ़्ट्वेर इन्स्टॉल करण्याआधी खात्री करुन घ्या की ते वापरण्यास योग्य आणि सुरक्षीत आहे.

२. एक सक्षम ऍन्टी व्हायरस प्रोग्राम आणि फ़ायरवॉल सॉफ़्टवेअर या अतिशय गरजेच्या बाबी तुमच्या पीसी वर असणे आवश्यक आहे. आणि नुसते इन्स्टॉल करुन भागणार नाही तर ते नेहमी अद्ययावत राखणे (update)तितकेच गरजेचे आहे. हे दोन्ही सॉफ़्टवेअर्स संगणकासाठी संरक्षक भींतीचे काम करतात.

३. ऑपरेटिंग सिस्टमला नेहमी अद्ययावत ठेवा. बहुतेक पीसी मायक्रोसॉफ़्ट विन्डोज या ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात. मायक्रोसॉफ़्ट कंपनी नेहमीच आपल्या उत्पदनांमध्ये सुधारणा करत असते आणि या सुधारणा अपडेट्स च्या स्वरुपात उपलब्ध करुन दिल्या जातात. त्याच प्रमाणे लिनक्स आणि मॅक या ऑपरेटिंग सिस्टम देखिल सतत अपडेट्स उपलब्ध करुन देत असतात.

४. ज्याची गरज नाही अशा सर्व सॉफ़्ट्वेअर्स, गेम्स, डाटा डिलीट करा. दर महीन्यातुन किमान एकदा तुमच्या कंप्युटरचा नीट आढावा घ्या आणि खरोखरीच गरज नाही अशा फ़ाईल्स डीलिट करुन टाका. कम्प्युटर च्या कन्ट्रोल पॅनल मध्ये असलेला ऍड/रीमूव्ह प्रोग्राम्स हा ऑप्शन वापरुन तुम्हाला नको असलेले प्रोग्राम्स डिलिट करता येतिल.

५. हार्ड ड्राइव्ह डीफ़्रॅगमेंट करत रहा. जेव्हा एखादी फ़ाईल सेव्ह केली जाते तेव्हा ती एका नियोजीत क्रमाने सेव्ह न होता उपलब्ध असलेल्या पहिल्या मेमरीच्या जागेवर सेव्ह केली जाते. त्यामुळे सेव्ह केला जाणारा सर्व डाटा विखुरलेला असतो. म्हणुनच अधुन मधुन हार्ड डीस्कला डीफ़्रॅग करणे गरजेचे असते. डीफ़्रॅगमेंटेशन म्हणजे मध्ये राहिलेल्या मोकळ्या मेमरीच्या जागा एकत्रित करणे. कम्प्युटर जलद गतीने चालावा म्हणुन डीफ़्रॅगमेंटेशन गरजेचे असते.


६.कीतीही म्हंटले तरी कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे आणि त्यामुळे ते कधी तरी खराब होणारच. म्हणुन आधीच सर्व आवश्यक आणि महत्वाचा डाटा सेव्ह करुन ठेवणे गरजेचे असते.यालाच बॅकप घेणे असेही म्हणतात. महत्वाचा डाटा सीडी किंवा अतिरिक्त हार्ड ड्राइव्ह वर सेव्ह करुन ठेवा जेणेकरुन कम्प्युटर मध्ये बिघाड झाल्यास जास्त नुकसान होणार नाही.

७. कंप्युटरवर धुळ साचली असल्यास ती नियमीत साफ़ करावी. कंप्युटरची जागा हवेशीर असेल याची काळजी घ्यावी.कंप्युटरवर कोणतेही सामान ठेऊ नका , त्यास अडगळिची जागा बनवु नका.

या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि निश्चींतपणे कंप्युटींगचा आनंद घ्या.

:-)

संगणकाचे आरोग्य कसे सांभाळाल? संगणकाचे आरोग्य कसे सांभाळाल? Reviewed by Salil Chaudhary on 20:41 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.