बिल गेट्स यांचा शालेय विद्यार्थ्याना सल्लामित्रहो, मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणुन प्रसिध्द असलेले बिल गेट्स आपणाला माहीत असतीलच! आपल्या मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञानाने सर्व जगावर राज्य करणारे बील गेट्स यांनी फार थोड्याच अवधीत हे यश संपादन केले आहे. थोड्क्यात काय तर बील गेट्स हे एक अत्यंत यशस्वी व्यक्तिमत्व आहे. तर अशा या यशस्वी व्यक्तीच्या यशामागील रहस्य आज आपण जाणुन घेउया आणि ते देखिल त्यांच्याच तोंडुन.

बील गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात काही अशा गोष्टी (१० नियम) सांगीतल्या ज्या कोणत्याही शाळेत शिकविल्या जात नाहीत. या भाषणात बील साहेबांनी आपल्या रुढ शिक्षण पद्धतीवर चांगलेच आसुड ओढलेत, सतत आदर्शवादाचा पुरस्कार करणारी आपली शिक्षण पद्धती मुलांना वास्तवापासुन दूर नेते आणि त्यामुळेच आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात अशा काही पिढ्या मागे सरत चालल्यात असे बील गेट्स यांचे मत आहे.

नियम १ - आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.

नियम २ - जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

नियम ३ - कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आ़कडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .

नियम ४ - आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.

णियम ५ - तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय ह सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.

नियम ६ - तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.

नियम ७ - उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.

नियम ८ - आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.

नियम ९ - टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.

नियम १० - सतत अभ्यास करणारया आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल .

बिल गेट्स यांचा शालेय विद्यार्थ्याना सल्ला बिल गेट्स यांचा शालेय विद्यार्थ्याना सल्ला Reviewed by Salil Chaudhary on 06:53 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.