माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या भाषणातील काही भाग - लीडरशीपमी तुम्हाला माझाच एक अनुभव सांगतो. १९७३ साली मी भारताच्या सॅटेलाइट लाँच व्हेइकल (उपग्रह क्षेपक वाहन) या प्रकल्पाचा प्रोजेक्ट डायरेक्टर झालो होतो. यालाच SLV-3 असेही नाव होते.सन १९८० पर्यंत "रोहीणी" या उपग्रहाला अंतरिक्षात पोहोचविणे हे आमचे लक्ष होते. या प्रकल्पासाठी लागणारे सर्व भांडवल आणि मनुष्यबळ मला उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र काही केल्या १९८० पर्यंत "रोहीणी" या उपग्रहाला अंतरिक्षात पोहोचविणे हे उद्दिष्ट पार करणे महत्त्वाचे होते. हजारो शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ या प्रोजेक्ट्वर अहोरात्र मेहनत करत होते.

सन १९७९ चा ऑगस्ट महिना , आम्हाला वाटले कि आता आम्ही तयार आहोत आणि आता रोहिणी प्रक्षेपणास तयार आहे .आम्ही कंट्रोल स्टेशन मध्ये रोहिणीच्या प्रक्षेपणाची तयारी केली. मात्र उपग्रहाच्या प्रक्षेपणाच्या केवळ चार मिनिट आधी संगणकाला काही बिघाड दिसुन आला आणि संगणकाने आपणहुन प्रक्षेपण रोखुन धरले. काही नियंत्रक बरोबर काम करत नाही आहेत हे संगणकावर दिसत होते. मी मझ्या टीमला याबाबत विचारले असता, त्यांनी काही कॅलक्युलेशन्स केले आणि मला सांगीतले कि घाबरण्याचे काही कारण नाही आहे. म्हणुन मी संगणकाच्या स्वयंचलित प्रणालीला टाळुन स्वतःच मॅनुअल मोडमध्ये रॉकेट प्रक्षेपीत(लाँच- launch) केले. सुरूवातीला सर्व काही ठिक झाले मात्र थोड्याच वेळात अंतरीक्षात झेप घेण्याऐवजी ते अवकाशयान बंगालच्या सागरात कोसळले. हा एक फार मोठा पराभव होता.

त्याच दिवशी इस्रो (ISRO - Indian Space Research Organization) चे चेयरमॅन प्रोफेसर सतिश धवन यांनी एक ईस्रोच्या आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथिल सॅटेलाइट लाँच सेंटर येथे पत्रकार परिषद बोलावली होती. रोहीणीच्या प्रक्षेपणाचा कार्यक्रम ७.०० वाजताचा होता आणि पत्रकार परिषद होती ७.४५ वाजता. प्रोफेसर सतिश धवन स्वतःच पत्रकारांना सामोरे गेले आणि त्यांनी या अपयषाची सर्व जबाबदारी स्वतः घेतली. त्यांनी पत्रकारांना सांगीतले कि संपूर्ण टीमने खुप मेहनत घेतली होती मात्र तरीही आणखी थोडी कसर बाकी राहीली. त्यांनी पुढ्च्या प्रयत्नात एका वर्षाच्या आतच पुन्हा यशस्वीरित्या हे काम पूर्ण होइल याची ग्वाही पत्रकारांना दिली. खरेतर त्यांनी माझ्या अपयशाची जबाबदारी स्वतः घेतली होती.

पुढ्च्याच वर्षी जुलै १९८० मध्ये आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न केला.आणि या वेळेला आम्ही यशस्वी झालो. पुर्ण भारत देश आनंदोत्सव साजरा करत होता. पुन्हा पत्रकार परिषद भरली होती.यावेळेला मात्र प्रोफेसर धवन यांनी मला बाजुला बोलावुन पत्रकारांना सामोरे जाण्यास सांगीतले.

त्यादिवशी मि एक महत्त्वाचा धडा शिकलो. जेव्हा पराभव होतो तेव्हा खरा संघप्रमुख (leader) स्वतः त्याची जबाबदारी घेतो मात्र यशाचे श्रेय तो सर्वस्वी त्याच्या संघाला (team) देतो.

हा सर्वात महत्त्वाचा व्यव्स्थापनाचा धडा (Management lesson) मी कोणत्या पुस्तकातुन नव्हे तर माझ्या या अनुभवातून शिकलो आहे.


डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या भाषणातील काही भाग - लीडरशीप माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या भाषणातील काही भाग - लीडरशीप Reviewed by Salil Chaudhary on 20:37 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.