वॉरन बफे यांचा मोलाचा सल्लाआपण सारेच जाणतो कि या नविन वर्षाची सुरुवात फ़ारशी उत्साहवर्धक नाही आहे आणी एकंदर सर्वत्र निराशेचाच अंमल दिसतो आहे.आर्थिक मंदी मुळे कुटुंब, कंपन्या, आणि पुर्ण देशच एका विवंचनेत गुंतला आहे. प्रत्येकालाच ही मंदीची लाट कधी ओसरतेय असे झाले आहे।

सर्वसामान्य माणुस यासाठी अर्थ तज्ञांकडे आशेने पाहत आहेत. पण मित्रहो हे जाणुन घ्या कि य सर्व आर्थिक गुंत्यास हे अर्थ तज्ञच कारणीभूत आहेत।

दरवर्षी मी काही धोरणे अवलंबतो, जी पुढे वर्षभर सर्व उलाढालीत माझ्यासाठी दिप स्तंभाचे काम करतात.आणि स्वतहच शिकून घेतलेल्या या धड्यांमुळे दरवर्षी माझे फ़क्त वयच वाढत नाही तर शहाणपणाही तेवढाच वाढतो।

या वर्षी मी तुम्हा सर्वांना पुराणकाळापासून चालत आलेल्या (पण विस्म्रुतीत गेलेल्या)अशाच काही शहाण पणाच्या गोष्टी सांगणार आहे -


  • अपार कष्ट करा : मेहनत कधिच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड माण्साला लयास नेल्या खेरिज राहत नाही.

  • आळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.

  • ऊत्पन्न(मिळकत) : कधिही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने येणाऱ्या १०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.

  • खर्च - आवश्यकते पेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकाव्याची वेळ येईल.

  • बचत - खर्च करुन उरलेले उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.

  • कर्ज - कर्ज घेणारा हा कर्ज देणरयाचा गुलाम हॊउन जातो.


  • जमाखर्च - जमाखर्च मांडणे आणि त्याचा अभ्यास करणे अतिशय मह्त्वाचे आहे. जर बूटच फ़ाटला असेल तर पावसाळ्यात छ्त्रीचा काय उपयोग ?

  • हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा भोकामुळे पुर्ण जहाज बुडू शकते.

  • आर्थिक धोका - बरयाच इन्वेस्ट्मेन्ट्स भरपुर फ़ायदा देणरया आणी आकर्षक असतात मात्र त्यात तेवढाच धोका लपलेला असतो. त्यामुळे अशा इन्वेस्ट्मेन्ट्सचा जरा काळजीपुर्वक विचार करुन करा. जर नदीची खोली पहायची असेल तर दोन्ही पाय पाण्यात टाकुन कसे चालेल?
  • गुंतवणुक - सर्व अंडी एकाच पारड्यात टाकुन कसे चालेल बरे?

मला खात्री आहे की जे या सर्व सुचनांचे आधीपासून पालन करत आहेत, त्य सर्वांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. आणी मी हे देखिल खात्रीपुर्वक सांगु शकतो, कि जे या सर्व सुचनांचे पालन करायचे ठरवतिल तेही लवकरच आर्थिक सुखाचा आनंद घेतिल. चला आपण सर्वजण हुशार हॊउया आणि एक सुखी, समाधनी आणी शांत जीवन जगुया।वॉरन बफे

वॉरन बफे यांचा मोलाचा सल्ला वॉरन बफे यांचा मोलाचा सल्ला Reviewed by Salil Chaudhary on 08:59 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.