गाणी शोधा गुगल काकांच्या (Google) मदतीने ! ( find songs with help of Google uncle)

ज्याला गाणे आवडत नाही असा मनुष्य शोधुनही सापडणार नाही. आणि संगीत हा तर मराठी माणसाचा आत्माच आहे. संगीत नाटके, चित्रपट, लावणी , कॅसेट्स , सीडी या मार्गाने प्रवास करत करत आता गाणी चक्क ऑनलाइन म्हणजे इंटरनेटच्या मार्गाने आपल्यापर्यंत येउन पोचली आहेत. आणि जेव्हा एखादी गोष्ट इंटरनेट पर्यंत येउन पोचते तेव्हा गूगलचा उल्लेख होणारच. मित्रांनो आज मी तुम्हाला गूगलच्या मदतीने आपल्याला हवी ती गाणी कशी शोधावीत आणि एक छदामही न खर्चता कशी डाउनलोड करावीत हे सांगणार आहे.
गाणी डाउनलोड करण्यासाठी आधी आपल्या आवडत्या गूगलकाकांच्या वेबसाइटवर जा.
(
http://www.google.com/ या साइटला मि प्रेमाने गूगलकाका म्हणतो.) गूगलच्या शोधस्तंभावर (google search bar) खाली दिलेली ओळ टाइप करा.


“parent directory” mp3 OR wma गायकाचे/वाद्यवृंदाचे नाव -html -htm -download -links"

या ओळीमधे "गायकाचे/वाद्यवृंदाचे नाव" काढून त्या जागी तुम्हाला हव्या असलेल्या गायकाचे नाव टाइप करुन एंटर (Enter) करा आणि पहा गूगलकाका कसे आपल्या पेटारयातून गाणी शोधून काढतात ते. मला खात्री आहे कि माझी ही टिप तुम्हाला खुप खुप आवडेल. म्हणुनच माझी एक विनंती आहे की जर ही टिप उपयुक्त आहे असे आपणास वाटले तर मला salil@netbhet.com वर इ-मेल करुन नक्की कळवा. तर मग मित्रांनो गाण्यांच्या सूरमयी दुनियेत हरवून जा , तोपर्यंत मी नविन "नेटभेट' शोधुन आणतोच तुमच्यासाठी !गाणी शोधा गुगल काकांच्या (Google) मदतीने ! ( find songs with help of Google uncle) गाणी शोधा गुगल काकांच्या (Google) मदतीने ! ( find songs with help of Google uncle) Reviewed by Salil Chaudhary on 22:05 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.