डिजिटल कॅमेरा कसा निवडावा ?

हल्ली कॅमेरा ही काही नाविन्याची गोष्ट राहीलेली नाही. डिजिटल कॅमेरा या तंत्रज्ञानाने केलेली क्रांन्तीही आताशा नविन राहीलेली नाही. मोबाइल असो अथवा कंप्युटर कॅमेरा कुठेच लपलेला नाही. पुर्वी फक्त काही खास समारंभासाठी वापरला जाणारा कॅमेरा आता सदासर्वदा हातातच असतो. या सर्व तांत्रिक प्रगतीमुळे सहजिकच सर्वच इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी डिजिटल कॅमेरयाकडे आपला मोर्चा फिरविला आणि त्यामुळेच ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

आणि जिथे एवढे पर्याय उपलब्ध झाले तिथे थोडा संभ्रम निर्माण होणारच, म्हणुनच मी आज तुम्हाला आणि तुमच्या खिशालाही परवडेल असा डिजिटल कॅमेरा कसा निवडावा याबद्दल माहीती देणार आहे -

१. कॅमेरा निवडताना त्याची मेगा पिक्सेल रेटिंग लक्षात घ्या - साध्या भाषेत सांगायचे तर पिक्सेल्स म्हणजे छायाचित्रामधील सुक्ष्मातिसूक्ष्म बिन्दू . जेवढे हे बिन्दू जास्त तेवढे चांगले व स्पष्ट चित्र. म्हणुनच जेवढे जास्त मेगा पिक्सेल्स असलेला कॅमेरा तेवढे उत्तम छायाचित्र आणि तेवढाच उत्तम कॅमेरा. जर तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफर बनणार असाल तर जास्त मेगा पिक्सेल्स असणारा कॅमेरा घ्या.

२. कॅमेरयाचा आकार ही दुसरी महत्त्वाची बाब. तुमचा वापर जसा असेल त्यानुसार कॅमेरयाची निवड करा. हल्लीचे युग हे लहान आणि कॉम्पॅक्ट (Compact) वस्तुंचे आहे. कॅमेरा वापरण्यास आणि हाताळण्यास सोयिस्कर असेल याची काळजी घ्या. प्रवासामध्ये कॅमेरा नेण्यास सोपा असेल याकडे लक्ष द्या.

३. डिजिटल कॅमेरयांची मेमरी हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. पाहिजे तितके फोटो साठवुन ठेवता येतिल असे महाकाय मेमरी कार्डस आजकल बाजारात उपलब्ध आहेत. कॅमेरयासोबत मोफत मिळणारया कार्डस मध्ये त्यांचा प्रकार (SD/MMC/microSD) आणि आकार (साइझ - MB/GB इत्यादी) या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बरयाच वेळा विक्रेते मुळ कॅमेरयाची किंमत कमी करण्यापेक्षा ग्राहकांना जास्ती मेमरी असलेले कार्ड्स देतात.

४. डिजिटल कॅमेरयाची बॅटरी हा आण़खीन एक महत्त्वाचा भाग. बॅटरीचे जीवनमान, चार्जींगसाठी लागणारा वेळ, चार्जींग करण्याची पध्द्त आणि चार्ज झाल्यावर बॅटरी किती वेळ टिकेल या गोष्टीं तपासुन घ्या , इतर कॅमेरयांशी तुलना करुन पहा.

५. डिजिटल कॅमेरा हा कंप्युटरला , टी.व्हीला तसेच प्रोजेक्टर्सला देखिल जोडता येतो. तुम्ही निवडलेल्या कॅमेरयामध्ये या सुविधा आहेत का हे तपासुन घ्या.

४. कॅमेरयाची किंमत आणि तुमचे बजेट यांची नीट सांगड घाला, काही अतिशय चांगल्या प्रतिचे आणि विविध सोयीसुविधा असण्यारया कॅमेरयांची किंमत ५००००- १००००० च्या घरात जाते. मात्र बेसिक सुविधा असणारे आणि घरघुती वापरांसाठी वापरण्यास योग्य अशा काही डिजिटल कॅमेरयांची किंमत ५००० ते २०००० पर्यंत असते. आपले बजेट आणि कॅमेरयात मिळणारया सुविधा यांचा योग्य मिलाफ होणे आवश्यक आहे. एखाद्या चांगल्या ब्रँडसाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागल्यास मागे पुढे पाहु नका मात्र केवळ ब्रँड न पाहता लेन्स्, आकार, किंमत आणि विक्रिपश्चात सेवा कशी आहे याकडे अधिक लक्ष द्या.

कॅमेरा निवडताना या गोष्टींवर लक्ष द्या आणि मग व्हा तयार क्लिक करायला.
( पुढे चांगल्या प्रकारे फोटो कसे काढावेत यावर माहीती देइन, पण त्याआधी कॅमेरा विकत घेउन स्वतःच प्रयत्न करून काही शिकुन पहा की !)

डिजिटल कॅमेरा कसा निवडावा ? डिजिटल कॅमेरा कसा निवडावा ? Reviewed by Salil Chaudhary on 07:13 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.