माहीतीचा खजिना - इस्निप्स्.कॉम (esnips.com)मित्रानो आज मी तुम्हाला मझ्या सर्वात प्रिय वेबसाइटची ओळख करुन देणार आहे . नाही, मी गुगल (Google), याहू (Yahoo) किंवा ऑर्कुट (Orkut) बद्दल काही सांगणार नाही आहे. आज मि बोलणार आहे "इस्निप्स्."कॉम (esnips.com) बद्दल.

आपण esnips.com बद्दल माहीती घेउयाच पण त्याआधी मी तुम्हाला सांगु इच्छितो कि esnips.com माझी सर्वात आवडती साइट का आहे ते. मला सांगा आपण इन्टरनेटचा वापर प्रामुख्याने कशाकरिता करतो? प्रत्येकाचे उत्तर वेगळे असेल कदाचीत पण सर्व साधारणपणे आपण इन्टरनेटचा वापर माहीती मिळवण्यासाठी करतो असे म्हणता येइल. अर्थात प्रत्येकास हवी असलेली माहीती वेगवेगळी असते. एखाद्या विषयावरील पुस्तक, लेख, गाणी, फोटोज, अर्थ असे या माहीतीचे वेगवेगळे प्रकार असतात. मित्रांनो esnips.com आपल्याला एकाच जागी हे सर्व तर पुरवितेच पण त्याहुन अधिक काही आपल्याला इथे बघायला मिळते. म्हणुनच तर esnips.com माझी फेवरेट साइट झाली आहे.


esnips.com कंटेंट शेअरींग वेब साइट (content sharing website) आहे.कंटेंट शेअरींग म्हणजे ही साइट वापरणारे लोक ( युजर्स-users) esnips.com वर मोफत खाते उगढुन त्यावर ५जीबी इतका डाटा साठवुन ठेवु शकतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे हा डाटा गाणी, व्हीडीओ क्लिप्स, इलेक्ट्रोनिक पुस्तके, वर्ड फाइल्स अशा बरयाच विविध स्वरुपात असतो. हा डाटा इन्टरनेट वर उपलब्ध असल्याने तो कधिही आणि कुठेही पाहता येतो. समजा तुम्हाला एखादे गाणे तुमच्या मित्राकडे पाठवायचे आहे तेव्हा esnips.com चा वापर करुन तुम्ही ते गाणे अप्-लोड करु शकता, जे तुमचा मित्र त्याच वेब साइटवरुन डाऊनलोड करुन घेउ शकतो. आणि अशा प्रकारे तो डाटा जगातील कोण्त्याही व्यक्तीसाठी उपलब्ध होतो.हजारो युजर्स(7,383,814) नी अप्-लोड केलेल्या अशा कित्येक फाइल्समुळे आज esnips एक माहीतीचा खजिनाच बनली आहे. एखाद्या विषयाबद्दल ओढ आणि आवड असणारया आणि आपले ज्ञान जगाबरोबर वाट्ण्यास उत्सुक असणारया कित्येक लो़कांचे esnips हे हक्काचे ठिकाण झाले आहे.

२००६ साली सप्टेंबर महीन्यात esnips.com ची स्थापना झाली. याएल एलिश या इस्राइली महीलेने या साइट्ची सुरुवात केली आणि आज तीच या कंपनीची सीइओ CEO आहे. केवळ विविध प्रकारचे ज्ञान आणि माहीती एकमेकांबरोबर वाटता यावी य उद्देशाने बनवण्यात आलेल्या य साइट्ने गेल्या २ वर्षात बरयाच नविन सुविधा यात वाढवित नेल्या. चला य सुविधांची जरा ओळख करुन घेउया -

१. esnips वर तुम्ही एकाच ठिकाणी सर्व आवडीच्या गोष्टींचा आनंद घेउ शकता. तुमचे विचार, फोटो, फाईल्स, साहीत्य सगळे काही इंटरनेट्वर जेव्हा हवे तेव्हा उपलब्ध.

२. कोण्त्याही प्रकारच्या फाईल्स अगदी सहजपणे अप्-लोड करा (अगदी स्वतहच्या आवाजातील गाणी , मुलांच्या वार्षीक समारंभातील न्रुत्य , कागद्पत्रे, आवडत्या वेब साइट्स चे पत्ते अगदी काहीही.

३. तुमच्या सर्व फाइल्स व्यवस्थीत फोल्डर्स मध्ये लावुन ठेवा, प्रत्येक फोल्डर एका वेब पेज मध्ये रुपांतरीत होइल. उपलब्ध असलेल्या विविध डिसाइन्सपैकी एक निवडा आणि हो तुमचे फोल्डर्स कोणाकोणास पाहता येतिल हे देखिल तुम्हिच ठरवा.

४. पब्लिक फोल्डर , ग्रुप फोल्डर आणि पर्सनल ग्रुप फोल्डर या प्रकारांपैकी तुम्हाला हवा तो पर्याय निवडा आणि तुमचे फोल्डर्स कोण कोण पाहु शकतील यावर पुर्ण कंट्रोल ठेवा.

५. esnips.com वर असलेले मार्केटप्लेस marketplace या सुविधेचा वापर करुन तर तुम्ही आपले सामान (कलाकुसर, चित्रे, फोटोज, दागिने काहीही) विकुही शकता. जगाची बाजारपेठ तुमच्या साठी एका क्षणात खुली.

६. ५जीबी (5 GB) इतकी मेमरी आणि ती देखिल अगदी मोफत.

मग व्हा तयार, भेट द्या http://www.esnips.com/ ला आणि हरवुन जा एका नव्या दुनियेत.

आणि हो esnips तुम्हाला कशी वाटली ते कळवण्यास विसरु नका.
पुन्हा भेटू आणखी एखादी नविन नेटभेट घेउन !


माहीतीचा खजिना - इस्निप्स्.कॉम (esnips.com) माहीतीचा खजिना - इस्निप्स्.कॉम (esnips.com) Reviewed by Salil Chaudhary on 07:26 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.