beyond spellings - vozme.com

English, dictionary, pronounce, voice, english reading, english names, web application,hindi, grammer, spellings
या इंग्रजी भाषेचं वागणं ना मला कधीच नीट कळत नाही. स्पेलिंग एक आणि उच्चार वेगळाच. Colonel या स्पेलिंग मध्ये र (R) कुठेच आला नाही, पण उच्चार मात्र कर्नल असा करायचा. minute ची स्पेलिंग एकच पण कधी मिनिट म्हणायचे तर कधी मायन्युट ! आता कोणत्या शब्दाचा कसा वापर करायचा हे आम्हा पामरांना कसे कळणार बरे?

पण तुम्हाला सांगतो या इंटरनेटने एकाही प्रश्न सोडला नाही. आपल्या सगळ्या समस्यांची उत्तरे यांच्याकडे अगदी तयार असतात. आपल्या या इंग्लिश उच्चारांची समस्यादेखिल एका वेबसाइटने सोडवली आहे.
त्या साइट्चे नाव आहे- www.vozme.com . (तशी ही समस्या थोड्याफार प्रमाणात वर्डवेब wordweb ने पण सोडवली आहे.)

vozme.com चक्क आपल्याला इंग्लिश वाचुन दाखविते. फक्त vozme.com च्या मुखपृष्ठावर असलेल्या चौकटीत आपल्याला हवा असलेला मजकुर टाइप करा अथवा कॉपी/पेस्ट करा. त्या नंतर कोणत्या भाषेत वाचायचे आहे हे ठरवा (होय, इंग्रजी व्यतीरिक्त इतरही भाषांमध्ये इथे वाचन होते. आणि हिंदी देखिल यामध्यी समावीष्ट आहे.)

आणखी एक गोष्ट. इथे तुम्ही स्त्रीच्या आवाजात ऐकणार की पुरुषाच्या हे सुध्दा ठरवु शकता. (अर्थात तुम्ही काय ठरवणार ते मला आधीपासुन माहीत आहेच!). त्यानंतर एंटर चे बटण दाबा की झाले सुरु वाचन.

एवढे करुन ही साइट थांबत नाही तर त्या मजकुराचे वाचन तुम्ही MP3 फाइलच्या रुपात साठवुन (save) ठेवु शकता.

शब्दांचे उच्चार जाणुन घेण्यासाठी, इंग्लिश नावांचे खरे उच्चार जाणुन घेण्यासाठी, आणि अगदीच एखादा मोठा लेख वाचायचा कंटाळा आला असेल तर असा लेख ऐकण्यासाठी अशा विविध गोष्टीत vozme.com चा वापर करता येतो.

मग वापरा vozm.com आणी मला सांगा lieutenant चा उच्चार कसा करणार ते?
beyond spellings - vozme.com beyond spellings - vozme.com Reviewed by Salil Chaudhary on 13:06 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.