सर्वोत्तम मोफत सॉफ्टवेअर - वर्डवेब

मराठी माणसाचे आणि इंग्रजीचे तसे पुर्वीपासून वाकडेच आहे. पण रडतखडत का होइना साहेबाच्या या भाषेशी आपण मैत्री केली खरी. आता फाड्फाड इंग्रजी बोलता येत नाही म्हणा पण तसे कामचलाऊ इंग्रजी आम्ही शिकलो. आणि आता इंग्रजी शिवाय ऑफीस मध्ये पानही हलत नाही, उठता बसता इंग्लिश बोलावच लागते आणि त्यातच आला इमेलचा त्रास. काय तर म्हणे written english म्हणजे लेखी भाषा . थोडी सुसभ्य इंग्लिश. इथे आधिच शब्दतुटवडा आणि त्यात ही नसती भानगड.


घाबरु नका! मी आपल्या आजच्या लेखातून या भानगडीतून मुक्तता करणारया एका मोफत सॉफ्टवेअरची ओळख करून देणार आहे. या सॉफ्टवेअरचे नाव आहे वर्डवेब (wordweb).वर्डवेब हे एक छोटेखानी, हाताळण्यास सोयीस्कर पण अतिशय उपयुक्त सॉफ्टवेअर आहे. खरेतर वर्डवेब ही एक डिक्शनरी आहे. यात तुम्हाला शब्दांचे अर्थ, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्या शब्दाचा वाक्यात उपयोग हे सर्व एकाच वेळी एकाच ठिकाणी पहायला मिळते. ते देखिल तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर. वर्डवेब ची आणखी एक खुबी म्हणजे यास इंटरनेटची आवश्यकता नसते. एकदा का कंप्युटरवर इन्स्टॉल झाला की वर्डवेब ची अविरत सेवा सुरु.वर्डवेबचा इंटरफेस म्हणजे चेहरामोहरा अगदी साधा आणि सोपा आहे. नविन ऊपयोगकर्त्यांनाही वर्डवेब वापरणे सोपे आहे. डिक्शनरीत एखादा शब्द शोधला की वर्डवेबच्या पटलाचे दोन भाग दिसतात. पहिल्या व वरच्या भागात शब्दाचा अर्थ, व्याख्या आणि वाक्यात उपयोग केलेला दिसतो. आणि दुसरया व खालच्या भागात समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, जवळचा शब्द (स्पेलींग), त्या शब्दाचा प्रकार, वर्ग, भाग आणि उपभाग असे इतर पर्यायही दिसतात.त्याचप्रमाणे विविध भागातील इंग्लिश भाषेप्रमाणे वर्डवेब सेट करण्याची यात सोय आहे. म्हणजे अमेरिकन, ब्रिटेन, कॅनडा, एशिया इत्यादी देशांतील इंग्लिश प्रमाणे वर्डवेब चालवता येतो. अक्षरांचा आकार कमी जास्त करण्याची सोय, हलके व आक्षेपार्ह शब्द वगळण्याची सोयही वर्डवेबमध्ये पुरवलेली आहे. खरेतर वर्डवेबचा वापर आणि उपयुक्तता लक्षात घेता अगदी पैसे मोजुन विकत घेण्यासारखे हे सॉफ्टवेअर आहे आणि तरीही कमाल म्हणजे वर्डवेब चक्क मोफत उपलब्ध आहे.माझ्यामते आजच्या घडीला इंटरनेटवर उपलब्ध असलेले हे सर्वोत्तम मोफत सॉफ्टवेअर आहे. तर असे हे सर्वतोपरी उपयुक्त सॉफ्टवेअर तुमच्या कंप्युटरवर असलेच पाहिजे. ते उपलब्ध आहे

http://www.wordweb.info/ या संकेतस्थळावर.


ही नेटभेट तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरु नका. पुढे इंग्लिश- मराठी डिक्शनरी बद्दल सांगेन, तोपर्यत वर्डवेबशी हातमिळवणी करुन घ्या !

सर्वोत्तम मोफत सॉफ्टवेअर - वर्डवेब सर्वोत्तम मोफत सॉफ्टवेअर - वर्डवेब Reviewed by Salil Chaudhary on 20:46 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.