work life balance

सुखी आणि समतोल आयुष्याचे रहस्य !
work life balance, career, hobbies, self help, family, being happy,forgive, positive life
१. शोधून काढा खरेच आयुष्यात सर्वात महत्त्वाचे काय आहे?

होय, सर्वात महत्त्वाचे हे आहे कि तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वात अग्रस्थानी काय असले पाहिजे ते जाणणे. बर्‍याच वेळा आज आपल्यासाठी ज्या गोष्टी प्रधान्य आहेत आपण त्यांनाच आयुष्य समजुन चालतो. खरे म्हणजे तुम्हाला आयुष्यात अग्रस्थानी काय हवय असे वाटते ते ठरवा, जे आज आहे ते नव्हे.
या साठी सर्वात सोपा उपाय म्हणजे ५ महत्त्वाच्या गोष्टींची (Priorities) यादी बनवा. घाई नको. स्वतःला दोन दिवसाचा वेळ द्या आणि विचार करुन ही यादी बनवा.
या यादीमध्ये काही टिपीकल उत्तरे असतील, ती अशी -
कुटुंब (Family)
मुले (Kids)
पालक (Parents)
करीअर (Careear)
आरोग्य (Health)
खेळ ( Sports)
छंद (Hobbies)
प्रवास (Travel)


२. अनावश्यक कामे/कृती टाळा - ( Drop Unnecessary Activities)
आता तुम्ही बनवलेल्या या यादीचा दीपस्तंभाप्रमाणे वापर करा. तुमच्या लक्षात येइल कि अनावश्यक कामांमध्येच जास्त वेळ दिला जातोय्.ज्या गोष्टी तुमच्या यादीत नाही आहेत अशा सर्व कामांसाठी वेळ दवडु नका. शक्य तिथे नाही म्हणा.
फक्त महत्त्वाच्या गोष्टींवरच लक्ष केन्द्रीत करा.

३. तुमच्या खाजगी वेळेचा योग्य वापर करा.

कधी कामाला जाण्यात तुम्ही टाळाटाळ करत नाही. डॉक्टर कडे जाणे , मुलांच्या शाळेत पॅरेंट मीटींगला जाणे टाळत नाहीत. तसेच तुमच्या खाजगी/वैयक्तीक वेळेबरोब्रर करा. खरेतर आपल्या ऑफीसच्या वेळेप्रमाणे वैयक्तीक आयुष्यात ठरावीक वेळ मिळत नाही. २४ तासांच्या दिवसातुन आपल्यासाठी वेळ कोरुन काढावा लागतो. म्हणुन या वेळेचा वापर काटेकोरपणे करा. या स्वतःला दिलेल्या वेळेत इतर कामांना लुडबुड करु देउ नका. आणि हो, तुमच्या या स्वतःसाठीच्या वेळेत सतत इमेल चेक करणे आणि मोबाइल जवळ बाळगणे सोडुन द्या.

जास्त तास ऑफिसम्ध्ये घालवल्याने जास्त काम होते ह एक गैरसमज आहे. कामासाठी ठरवलेलं आठ तासांचं गणित हे खुप काळजीपुर्वक आणि वैज्ञानीक पध्दतीने ठरवलेले आहे. आपला परफॉरमन्स कधीच किती वेळ काम केले यावर अवलंबुन नसतो.

४. कुटुंबीयांची आणि सहकार्‍यांची मदत घ्या.

आपले भागीदार, सहकारी, कुटुंबीय आणि मित्र परीवार या सर्वांची योग्य तेथे मदत घ्या. कधी ऑफीस मधील एखादे काम आणि त्याच वेळी एखादे पर्सनल काम असा पेच निर्माण झाल्यास कधी ऑफीस मधिल सहकारी तर कधी मित्र परिवार अथवा कुटंबातील एखादा सभासद आपले काम करुन देउ शकतो.

५. रीलॅक्स रहा, आनंदी रहा.

मनाला आनंद आणि शरीराला विश्रांती या समतोल व सुखी आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत.आणि या दोन्ही गोष्टी अगदी फ्री आहेत. आनंदी रहाण्यासाठी तुम्ही करोडपती असावयास हवे, अथवा तुमच्या कडे भरपुर फावला वेळ असला पाहीजे असे मुळीच नाही. मी एक मला पटलेला फॉर्म्युला सांगतो. तुम्हालाही तो पटेल असे नाही पण बघा प्रयत्न करुन. मला मात्र या फोर्म्युल्यामुळे ८०% रीझल्ट मिळालेला आहे.

आनंदी आयुष्यासाठी पुढील पाच गोष्टी अतिमहत्वाच्या आहेत -
१. कुटंब - आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. आई वडीलांबरोबर रोज थोडा वेळ बोलणे ( आठवून पहा कधी आपल्या आई बाबांबरोबर एखाद्या अवांतर विषयावर चर्चा केली आहे का?), छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचे मत विचारणे, त्यांच्या आवडीची भाजी, पुस्तक, सीडी अशा गोष्टी अधुन मधुन घरी आणा.
मुलांबरोबर खेळा (मैदानात जाउन त्यांच्या मित्रांबरोबर तुम्ही देखिल खेळा, अधुन मधुन मुलांच्या मित्रांना घरी बोलवा आणि सर्व जण मिळुन घरीच मॅच पाहणे, एखादा चित्रपट पाहणे, कधी पाणीपुरीचा कार्यक्रम असे छोटेखानी प्रयोग करा.

२. व्यायाम - दिवसातुन किमान २०-३० मिनिटे व्यायाम केलाच पाहीजे.

३.छंद - प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतोच. फक्त आयुष्याच्या रहाटगाडग्यात आपण ते छंद जोपासणे विसरुन जातो. ते होउ देऊ नका. काहीही करुन आपला छंद जोपासणे सोडु नका. नवनिर्मीतीचा आनंद काही औरच असतो.

४.खंत बाळगु नका - जुन्या कोणत्याही गोष्टीची खंत/राग्/द्वेष बाळगु नका.कारण मनात साठवलेल्या या भावना मनावरचं ओझे वाढवत राह्तात. ते हलके करा. एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा मनासारखी झाली नाही म्हणुन रडण्यापेक्षा जे मिळाले आहे त्याचा आनंद घ्या. सचिन तेंडुलकरने एवढे रेकॉर्ड्स केले परंतु आजही त्याचे त्रीशतक झाले नाही म्हणुन आपण हळहळ्तो हे कितपत बरोबर आहे. खरेतर सचिन स्वतः असा विचार करत नाही. आणि म्हणुनच तो ग्रेट सचिन आहे.

५. माफ करायला शिका - कोणी माफी मागो अथवा न मागो त्याला मनातुन माफ करायला शिका. माफ करणारा नेहमी मोठा असतो.आणि मोठाच राहतो. दुसर्‍यांच्या चुकांमुळे आपण रागावतो आणि त्रागा करुन घेतो. त्यापेक्षा माफ केल्यास आपल्यालाच समाधान मिळते आणि चुकीचे वागणारे १० पैकी किमान ८ जण तरी माफ केल्यावर सुधारतात. इतकेच नव्हे तर आपले मित्र बनतात.
मग करा तर सुरुवात. आपल्या आयुष्याची दोरी दुसर्‍या कोणाच्या हातात का द्यायची. करीअर आणि फॅमीली दोन्ही आघाड्यांवर बाजी मारा. समतोल आयुष्याच्या दिशेने पाऊल टाका.
work life balance work life balance Reviewed by Salil Chaudhary on 19:58 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.