निसर्गाकडून आपण काय शिकू शकतो?

निसर्गाकडून आपण काय शिकू शकतो?

स्टीव्ह समार्तीनो यांच्या startupblog मधुन साभार.

निसर्ग आपल्याला बरेच काही शिकवत असतो. पण आपणच त्याकडे दुर्लक्ष करतो. जरा डोळे उघडे ठेवुन निसर्गाच्या अविष्कारांकडे पहा, बरेच काही शिकायला मिळेल.
त्यापैकीच हे एक उदाहरण.

जगातील सर्वोत्कृष्ट पॅकींगचा नमुना - केळे (Banana)

उघडण्यास सर्वात सोपे, पण तेव्हाच जेव्हा पुर्ण पिकलेले असते.

आवरण काढुन ठेवण्याची गरज नाही. फक्त साल थोडेसे सोलुन खाता येते.

जसजसे केळे पिकु लागते तसतसे त्याची साल आपला रंग बदलते. त्यामुळे केळे केव्हा खाण्यास उपयुक्त आहे हे आपल्याला पॅकींग पाहुनच कळते.

प्रत्येक केळ्याची क्वॉलीटी त्याच्या पॅकींगवरुन ओळखता येते.

केळे खाण्यास योग्य आहे की नाही हे पॅकींग वरुनच कळते. ज्याप्रमाणे औषधांवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते अगदी तशीच सोय केळ्याच्या सालामध्ये करून ठेवलेली आहे.

जरी केळे उत्कृष्टरीत्या पॅक केले असले तरी ग्राहकाला त्याचा वास मात्र पॅकींग न उघडताच घेता येतो.

केळ्यांचा घड हाताळण्यासाठी अगदी सोपा असतो. म्हणजे अगदी अर्धा डझन, एक डझन असे वेगवेगळे पॅक सहजरीत्या बनवता येतात.

दिसायला नाजुक असले तरी केळयाची पुर्णपणे काळजी त्याच्या सालीमुळे घेतली जाते.

केळ्याचे साल Biodegradable आहे. म्हणजे केळयाची सालीची निसर्गाला कोणताही धोका न पोहोचवता विल्हेवाट लावता येते. (सध्या पॅकींगसाठी सर्रास वापरण्यात येणार्‍या प्लास्टीकचे मात्र असे नाही !)

बघा कीतीतरी फायदे आहेत या पॅकींगचे. तुम्ही पण बघा आजुबाजुला आणि काढा शोधुन असे काही ज्ञानवर्धक सापडतंय का?

Posted in entrepreneurship by Steve Sammartino on April 6, 2009
निसर्गाकडून आपण काय शिकू शकतो? निसर्गाकडून आपण काय शिकू शकतो? Reviewed by Salil Chaudhary on 02:42 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.