Clocky - an innovative product

परवा नेट वर मुक्त संचार चालु असताना एक लेख वाचायला मिळाला. हा लेख होता एका घडयाळासंबंधी. होय एका गजराच्या घड्याळासंबंधी. अहो हे काही साधे सुधे घड्याळ नाही. हे घड्याळ म्हणजे सृजनशक्तीचा (innovation) एक उत्तम नमुना आहे.

या घड्याळाचे नाव आहे क्लॉकी (Clocky).रोज सकाळी उठण्यासाठी आपण गजर लावतो. आणि गजर वाजला की मस्तपैकी तो बंद करुन पुन्हा झोपी जातो. आपल्या सगळ्यांचंच असे होते. यावर उपाय म्हणुन क्लॉकीचा जन्म झालाय. क्लॉकी नुसता गजर वाजवुन थांबत नाही तर आपण झोपेतून उठणारच याची पुरेपुर काळजी घेतो.
क्लॉकीचा गजर वाजवल्यानंतर एकदा त्याला तात्पुरता बंद करता येतो. आणि काही वेळाने तो पुन्हा वाजु लागतो. तशी ही सुविधा सर्वच गजराच्या घड्याळांमध्ये असते. यालाच snooze time असे म्हणतात.


पण क्लॉकी काय करते माहीत आहे का?

दुसर्‍यांदा म्हणजे snooze time नंतर क्लॉकी चक्क पळायला लागतो. होय क्लॉकीला रबराची दोन चाके आहेत. एका सरळ रेषेत न पळता तो आडवा तिडवा कसाही पळतो. आणि पळता पळता त्याचे छोटेखानी स्पीकर्स गजर करतच राह्तात. म्हणजे उठल्याउठल्या पहील्यांदा लपाछपी किंवा पकडापकडी खेळावी लागते.

आहे की नाही क्लॉकी स्पेशल?


क्लॉकी दिसायला अगदी लहान बाळासारखा आहे. त्याची दोन बटणे दोन डोळ्यांसारखी दिसतात. आणि क्लॉकी लहान बाळासारखा अवखळ आहे. तो ३ फुटांवरुन उडी मारु शकतो, लाकुड, कार्पेट, गादी कशावरही चालतो आणि मुख्य म्हणजे अक्षर्क्षः लपाछुपी खेळत असतो.
असा आहे क्लॉकी - एक साधा पण उपयोगी आविष्कार.

क्लॉकीबद्दल अधीक जाणुन घ्या - क्लॉकी

तुम्हाला माहीत आहे मी काय करतो ते लवकर उठण्यासाठी? अलार्म लावुन घड्याळ अशा ठिकाणी ठेवतो की मला ते जागेवरुन ऊठुनच बंद करावे लागेल. उदाहरणार्थ
हँगरला अडकवलेल्या पँटच्या खिशात किंवा बॅगमध्ये.

सोपा आणि साधा उपाय.


Clocky - an innovative product Clocky - an innovative product Reviewed by Salil Chaudhary on 11:20 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.