Creative China !

बिल गेट्स एकदा म्हणाला होता की चिनी हे जगातील सर्वात हुशार लोक आहेत. आणि आता मी देखील तेच म्हणतो आहे. (बघा, माझे आणि बिल गेट्सचे विचार किती जुळतात ते!)


खाली दिलेल्या चित्राकडे एकदा नजर टाका म्हणजे मी असे का म्हणतोय याचा तुम्हाला अंदाज येईल.
तुमच्यापैकी किती जणांना NOKLA (नोकला) माहीत आहे (चुकुन नोकिया असे वाचु नका!)? नोकला ही नोकियाच्या सर्व फोन डीजाइन्सची अगदी तंतोतंत कॉपी करणारी एक चीनमधील एक कंपनी आहे. तर अशा या कंपनीने नुकताच सादर केलेला हा नविन नोकिफोन (Nokiphone 3000). हा मोबाइल म्हणजे नोकिया कंपनीचा N95 आणि अ‍ॅप्पल कंपनीचा iPhone (आय- फोन) यांचा सुंदर मिलाफ आहे.

Nokiphone N3000i चे हे काही फीचर्स.


  • 32 inch screen - 32 इंच स्क्रीन
  • Blue-tooth - ब्ल्यु टुथ
  • Wi-fi - वाय फाय
  • Dual Sim (Thats my favourite feature) - दोन सीम कर्ड ठेवण्याची सोय यात आहे.
  • It has a dual slider like Nokia N95 - Nokia N95 प्रमाणेच यात दोन्ही बाजुने स्लायडर ची सुविधा पुरवण्यात आली आहे.हा लेख लिहिण्यामागे एकमेव कारण म्हणजे जरी कॉपी असली तरी योग्य वेळी योग्य ठिकाणी आपले प्रॉडक्ट बाजारात कसे आणायचे ही नक्कीच शिकण्यासारखी गोष्ट आहे.

Creative China ! Creative China ! Reviewed by Salil Chaudhary on 23:09 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.