Easy and free, word to pdf tool at your homepage.


बर्‍याचदा आपल्याला काही वर्ड डॉक्युमेंट्स सुरक्षीत अशा PDF (पीडीएफ) मध्ये रुपांतरीत करावी लागतात. मुख्यतः ई-मेल करताना किंवा कोणालाही पाठवलेल्या डॉक्युमेंट्समध्ये फेरबदल करता येउ नये यासाठी PDF फॉरमॅट वापरतात.


तसे पाहीले तर या कामासाठी अक्षरक्षः हजारो सॉफ्टवेअर्स इंटरनेटच्या महाजालावर उपलब्ध आहेत. पण हे सर्व मोफत सोफ्टवेअर्स डाउनलोड करुन घ्यावे लागतात आणि डाउनलोड केल्यानंतरही काही दिवसच मोफत चालतात. (३० दिवसांची ट्रायल) आणि नंतर विकत घ्यावे लागतात.


आज मी तुम्हाला असे एक वेब अप्लिकेशन सांगणार आहे जे तुमचे हे काम कोणत्याही डाउनलोड शिवाय मोफत करुन देइल. आणि अगदी तुम्हाला पाहीजे तेव्हा आणि पाहीजे तितक्या वेळा.


मुख्य म्हणजे या साठी तुम्हाला Google चे होमपेज (iGoogle) सोडुन कोठेही जावे लागणार नाही. कारण http://www.pdf24.org/ या वेब साईटवर उपलब्ध असलेल्या या वेब अप्लिकेशनचे विजेट्स (widgets) बनवता येतात.

[विजेट्स म्हणजे सॉफ्टवेअर कोड्चे छोटे तुकडे, जे iGoogle सहजगत्या इतर वेब साईटवर चिकटवता येतात. चिंता करु नका फार सोपे आहे ते!]

कसे सुरु कराल?

- आधी iGoogle ला होमपेज करुन घ्या.


- नंतर इंटरनेट एक्स्प्लोरअरच्या अ‍ॅड्रेस बार मध्ये खालील URL चिकटवा (कॉपी आणि पेस्ट) किंवा खालील URL ला क्लिक केलेत तरी पुरे.- "Add to iGoogle" हे बटण दाबा.


- वर्ड टु पीडीएफ रुपांतरण सुरु.

आणखी काही फायदे !

- यात पीडीएफ रुपांतर करुन पाहीजे तिकडे इ-मेल देखील करता येते.


- एखादे वेब पेज किंवा पुर्ण वर्ड डॉक्युमेंट रुपांतरीत करुन पाठवीता येते.


- पुर्णपणे मोफत आणि अगदी घरच्या घरी (म्हणजेच होम पेजवर हो!)
Easy and free, word to pdf tool at your homepage. Easy and free, word to pdf tool at your homepage. Reviewed by Salil Chaudhary on 10:35 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.