Fastest and easiest way to send files over internet - jetbytes.com

एक गोष्ट मला खुप दिवसापासुन सतावत होती. ती म्हणजे इंटरनेटवर एखादी फाईल पाठवण्याची. अगदी साधी वर्ड फाईल असुदे किंवा फोटो काही पाठवायचे झाले की माझ्या कपाळावर आठया आल्याच म्हणुन समजा.

पण शेवटी माझा हा प्रश्न सोडवणारा एक उपाय मला सापडलाच ! त्याचे नाव आहे "जेटबाईट्स" (Jetbytes.com)
जेव्हा पण आपल्याला एखादी फाईल इंटरनेटवर कोठे पाठवायची असते तेव्हा पहीला उपाय आठवतो ते इ-मेलचा. पण ई-मेल वर अटॅचमेंट पाठवायची म्हणजे काही सोपे काम नाही. पहील्यांदा फाईल अपलोड करा, मग ती स्कॅन होईपर्यंत वाट पहा आणि मग पाठवा. आणि फाईलचा आकार आणि त्यामुळे ई-मेल पोचावयास लागणारा वेळ हे नेहमीचे प्रॉब्लेम्स तर असतातच.

दुसरा मार्ग म्हणजे, विविध फाईल शेअरींग साईट्स वर आधी फाईल अपलोड करा. आणि मग त्यांनी दीलेली लिंक पाठवा. फाईलच्या आकारामुळे येणारे प्रॉब्लेम जरी सुटले असले तरी या प्रकाराचे काही तोटे आहेतच. एकतर अशा साईट्सवर रजीस्ट्रेशन करावे लागते आणि फाइल अपलोड होण्यासाठी प्रचंड वेळ लागतो.

पण मित्रहो, जेटबाईट्सने हे सर्व प्रॉब्लेम्स मुळापासुन नष्ट केले आहेत.

जेटबाईट्स कसे काम करते?

1. http://www.jetbytes.com/ या साईटवर जा.

2. मग तेथुन जी फाईल पाठवायची आहे तिथे जा. (Browse to the location of file in your computer)

3. Jetbytes लगेचच एक वेबलिंक बनवेल. (फक्त 1-2 सेकंदातच !)

4. ही वेबलिंक कॉपी करा आणि तुम्हाला जिथे पाठवायची असेल तेथे ई-मेल्ल करा.

5. ई-मेल मिळाल्यानंतर या लिंकवर क्लिक केल्यास त्या फाईलचे आपोआप डाउनलोड सुरु होइल.


जेटबाईट्स मला का आवडले ?

1. जेटबाईट्स पुर्णपणे मोफत आहे.

2. अधीक जलद आहे.

3. कोणत्याही रजीस्ट्रेशनची गरज नाही

4. वापरावयास खुप सोपे आहे.


मोफत वस्तुंकडुन यापेक्षा अधीक काय पाहीजे?टीप -
1. जेटबाईटने बनविलेली लिंक ही तात्पुरत्या स्वरुपाची असुन एकदा क्लिक केल्यावर ती नष्ट होते. त्यामुळे एकापेक्षा अधीक व्यक्तींना एकच लिंक पाठवणे शक्य नाही.

2. तुम्ही स्वतः त्या लिंकला क्लिक करु नका.
Fastest and easiest way to send files over internet - jetbytes.com Fastest and easiest way to send files over internet - jetbytes.com Reviewed by Salil Chaudhary on 11:41 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.