Gmail वर मेल लिहा पाच भारतीय भाषांमध्ये !Gmail वर मेल लिहा पाच भारतीय भाषांमध्ये !Compose emails in 5 indic languages on Gmail Gmail
जीमेल या आपल्या सर्वात आवडत्या ईमेल सर्विसने नुकताच पाच भारतीय भाषांमध्ये ईमेल लिहिण्याची सोय केली आहे. इंटरनेटच्या जगतात ई-मेल हे सर्वाधीक वापरले जाणारे टूल आहे. आणि म्हणूनच कदाचीत सर्व लोकांकरीता हे उपलब्ध करून देण्याचा गूगल काकांचा मानस असेल.
आता भारतीय वापरकर्ते ५ विविध भाषांमध्ये Gmail वर ई-मेल लिहु शकतात. हिंदी, तामीळ, तेलुगु, कन्नडा आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये आता ई मेल लिहिता येइल.
हिंदी स्क्रीप्टचा वापर करुन यात मराठी मध्ये सुध्दा लिहिता येइल. त्यामुळे मराठी वाचकांना नाराज होण्याचे काही कारण नाही.

गुगलची ही नविन सोय आपोआप जीमेल वर दिसु लागेल. परंतु ज्यांच्या ईमेल अकाउंट वर हे दिसणार नाही त्यांना पुढे दिल्या प्रमाणे "settings" मध्ये जाउन ते अ‍ॅक्टीवेट करावे लागेल. नेहमी प्रमाणे गुगलने आपल्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आता त्याला प्रचंड प्रतीसाद देणे आपल्या हातात आहे.
Gmail वर मेल लिहा पाच भारतीय भाषांमध्ये ! Gmail वर मेल लिहा पाच भारतीय भाषांमध्ये ! Reviewed by Salil Chaudhary on 11:25 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.