Good to see a good face of IPL !


IPL चे दुसरे सत्र आता चांगलेच रंगात आले आहे. मात्र या खेपेस IPL ने फक्त मनोरंजनच न करता इतरही काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत. IPL ने चक्क सामाजीक कार्यात वाटा उचलला आहे. ही निश्चीतच एक चांगली बाब आहे.

प्रत्येक सामन्याची १००० तिकीटे काही गरजवंत शाळांना देण्यात येणार आहेत. या शाळा तिकीटांची विक्री करुन जो पैसा कमावतील तो पैसा त्या शाळांच्या शैक्षणीक गरजा पुर्ण करण्यासाठी वापरु शकतील. आणि जे कोणी या शाळांकडून तिकीटे खरेदी करतील त्यांना प्रत्येक तिकीटामागे दोन तिकीटे मोफत देण्यात येतिल.

HEAT (हीट) असे नाव असलेल्या या समाजीक कार्याच्या प्रकल्पासाठी DLF IPL ने ८० करोड रँड् (Rand - दक्षीण अफ्रीकेचे चलन) इतके अनुदान दीले आहे. कोणत्याही क्रीडा संघटनेने चालवीलेला हा दक्षीण अफ्रीकेमधील हा सर्वात मोठा सामाजीक प्रकल्प आहे.जिथे जिथे IPL चे सामने होणार आहेत तेथील जवळच्या तीस (३०) शाळांना या प्रकल्पाद्वारे १००००० रँड इतका नीधी शिष्यवृत्तीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केप टाउन येथील अलेक्झांडर सिंटन स्कूल या शाळेला मागील आठवड्यात १००००० रँड देण्यात आले.

HEAT प्रोग्रामचा दुसरा भाग म्हणजे वैयक्तीक शिक्षणार्थींसाठी असलेले १५००० रँडचे बक्षीस. सामना बघायला आलेल्या कोणत्याही पाच विद्यार्थ्यांना निवडण्यात येइल. त्यांचे चेहरे मैदानावरील स्क्रीनवर दाखवण्यात येतील आणि त्यांना शिक्षणासाठी १५००० रँड दीले जातील.

IPL चा हा चांगला चेहरा पाहुन खरंच खुप बरं वाटले. पण त्याचवेळेस एक विचार मनात येउन गेला की या सुविधा भारतातील विद्यार्थ्यांना मिळाल्या असत्या तर!

असो, कुठे का असेना गरजवंताना मदत मिळते आहे आणि ते ही भारताकडुन. हे ही नसे थोडके.
Good to see a good face of IPL ! Good to see a good face of IPL ! Reviewed by Salil Chaudhary on 11:43 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.