Learn to type SMS faster ( T9 Dictionary)

SMS करणे हा हल्ली संवाद साधण्याचा एक उत्तम मार्ग ठरला आहे. अगदी कामापुरता आणि मोजकाच संदेश देणारी SMS ची सुविधा खुपच फायदेशीर ठरते. बर्‍याच वेळा मित्रांसोबत (किंवा मैत्रीणींसोबतही !) उगाच बसल्या बसल्या SMS वर गप्पा मारत राहणे ह हल्ली तरुणाइचा छंदच झाला आहे. मग अशा वेळेला भराभर मोबाइलच्या बटणांवर बोटे चालवावी लागतात. आजचा आपला लेख आपल्या तरुण मित्रांना जलदरीत्या SMS टाइप करायला नक्कीच मदत करेल.

प्रत्येक मोबाइलमध्ये मेसेजेस (messages) मध्ये आपल्याला T9 डिक्शनरीचा पर्याय आढळतो. मेसेजेस मध्ये सेटींग्स (Settings) मध्ये गेल्यास हा पर्याय दिसतो. नोकीया (Nokia) मोबाइल फोन वापरणार्‍या लोकांना (दहामध्ये किमान सहा लोक तरी नोकियाचा मोबाइल वापरत असतील) "new message" मध्ये गेल्यावर # हे बटण सतत दाबून T9 डिक्शनरी सुरु करता येते. फक्त # हे बटण जोपर्यंत "=abc/ =Abc" असे मोबाइलच्या स्क्रीनवरील डाव्याबाजुला दिसत नाही तो पर्यंत दाबत राहायचे.

एकदा T9 डिक्शनरी चालु झाली कि अर्धे काम झाले म्हणुन समजा.

आता आपण सध्याच्या मेसेज टाइप करण्याच्या पध्दतीकडे बघुया. मोबाइलच्या प्रत्येक बटणावर तीन अक्षरे छापलेली असतात.

2 = abc
3 = def
4 = ghi
5 = jkl
6 = mno
7 = pqrs
8 = tuv
9 = wxyz

आणि प्रत्येक अक्षर स्क्रीन वर येइपर्यंत ते बटण दाबावे लागते. उदाहरणार्थ enjoy असे टाइप करावयाचे असल्यास

e = 33
n = 66
j = 5
o = 666
y = 999

असे टाइप करावे लागेल. म्हणजेच एक पाच अक्षरी शब्द लिहिण्यासाठी ११ वेळा बटण दाबावे लागते.
T9 डिक्शनरी मुळे हा वेळ वाचतो कारण पाच अक्षरी इंग्लीश शब्द टाइप करण्यासाठी पाच वेळाच बटण दाबावे लागते. कसे ते बघा.
आपल्या मोबाइल मध्ये एक डिक्शनरी समावीष्ट केलेली असते. आणि जसजसे आपण अक्षर अथवा बटण दाबत जातो , त्याप्रमाणे एक इंग्रजी शब्द तयार होत जातो.

उदाहरणार्थ - T9 डिक्शनरी चालु करुन त्यानंतर enjoy असे टाइप करावयाचे असल्यास -

e = 3
n = 6
j = 5
o = 6
y = 9
एवढेच टाइप करायचे. बस झाले काम!
कदाचीत पहील्या काही अक्षरांनतर उचीत इंग्लीश शब्द दिसणार नाही. पण शेवटच्या अक्षरापर्यंत तो नक्की येइल.

आहे की नाही T9 फायदेशीर. मग वापरा T9 आणि मला कळवा तुमचा SMS टाइपींगचा स्पीड वाढला की नाही ते.

(टीप - ही सुविधा फक्त इंग्रजी भाषेमध्ये आहे , इतर सर्व भाषांमध्ये T9 काम करणार नाही.)


Learn to type SMS faster ( T9 Dictionary) Learn to type SMS faster ( T9 Dictionary) Reviewed by Salil Chaudhary on 20:51 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.