My lessons in life - Azim Premji


उत्तर द्या , प्रतिक्रीया नको - अझिम प्रेमजी

मला इथे बोलावल्याबद्दल मी आपला आभारी आहे.तरुणांबरोबर राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो.गमतीशीर गोष्ट म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची किंमत तेवाच कळते जेव्हा ती गोष्ट आपल्याला सोडुन जाऊ लागते. जसेजसे माझे केस आपला काळा कुळकुळीत रंग सोडून पांढर्‍याकडे झु़कु लागले आहेत तसे मला तरुणपणाचे महत्त्व जास्त जाणवु लागले आहे.

मात्र आता या उतारवयातच मला आयुष्याकडुन मिळालेल्या काही धड्यांचे महत्त्व देखिल जाणवु लागले आहे.मला विश्वास आहे की माझे ते ज्ञान तुम्हा सर्वांना तुमचे आयुष्य आणि करिअर प्लान करण्यास उपयुक्त ठरेल.

पहिला धडा - मी आयुष्यातून हे शिकलो की नेहमी आपल्या सामर्थ्यावर लक्ष केन्द्रीत करा.आपण अगदी शाळेत असल्यापासुन सर्वचजण आपल्या कमजोर बाजुंकडे पाहत आले आहेत. हे चुकीचे आहे. एक जुनी कथा आहे, सशाची.

तो जेव्हा शाळेत होता तेव्हा त्याला उत्तम धावता येत होते पण पोहोण्यात मात्र तो फार कच्चा होता.वर्षाच्या शेवटी त्याला धावण्यात पुर्ण मार्क्स मिळतात मात्र पोहोण्याच्या विषयात बिचारा ससा नापास होतो. सशाचे पालक चिंताग्रस्त होतात. सशाचे बाबा बोलतात, पुरे झाले धावणे. असा पण तु खुप चांगला धावतोस. पोहोण्यावर जास्त लक्ष दे. बिचारा ससा धावण्यातला आनंद बाजुला ठेवुन पोहोण्याच्या क्लासेसला जाउ लागतो.मग काय होते माहित आहे? सशाला पोहोण्यात फारशी प्रगती करता तर येत नाहीच पण बिचारा हळु हळु धावणेही विसरुन जातो.

मित्रांनो आपण कशात कमी पडतो हे जाणून घेउन त्यावर मात करणे महत्त्वाचे असतेच पण त्याहीपेक्षा आपली खरी ताकद काय आहे हे ओळखुन त्यात अधिक प्राविण्य मिळवणे हे महत्त्वाचे असते. खरेतर दुबळेपणावर मात करण्याची प्रेरणा आपली बलस्थानेच आपल्याला देत असतात.

दुसरा धडा - मी हे शिकलोय की स्वकष्टाने मिळवलेला एक रुपया हा काहीही मेहनत न घेता मिळवलेल्या पाच रुपयांपेक्षा खुप खुप मौल्यवान असतो. माझ्या एका मित्राने मला त्याच्या भाचीची गोष्ट सांगीतली होती. तिला तिच्या न्याहारीबद्दल नेहमी तक्रार असायची. स्वयंपाक्याने जे जे शक्य होते ते सर्व तिला करुन खाउ घातले मात्र ती सदैव नाखुशच राहीली.एके दिवशी माझा मित्र तिला बाजारात घेउन गेला आणि काही शिजवण्यास तयार असणारे खाद्यपदार्थ (रेडी टु इट ready to eat food)विकत घेउन दिले.मग घरी आल्यवर तिने स्वत: पॅकेट उघडुन, भांडयात पाणी घेउन स्वतः ते शिजवले.आणि ते तिला सर्वात चविष्ट खाणे वाटले.फरक इतकाच कि ते तिने स्वतः बनविले होते.

मी माझ्या आयुष्यात हे शिकलोय की आपण स्वतः कष्टाने मिळवलेल्या गोष्टीइतके समाधान दुसर्‍या कशातही नसते.आणि जे मोफत अथवा सहजसाध्य असते ते "अचानक आले आणि अचानक गेले" या नियमाने लगेच निघुनही जाते.

तिसरा धडा - आयुष्यात बरीच आव्हाने येतात्.काहींमध्ये आपण जिंकतो तर काहीवेळा हार नशिबात येते.प्रत्येक डावात कोणी फलंदाज शतक करु शकत नाहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे असते.जिंकण्याचा आनंद जरुर घ्यावा पण यश हाताळताही आले पाहिजे, ते डोक्यात जाता कामा नये.यश डोक्यात गेलं की तुमची अधोगती सुरु झालीच म्हणुन समजा. आणि कधी परजयाची नामुश्की आलीच तर त्यालाही खेळकरपणे स्वीकारा.अपयषाची शिक्षा स्वतःला करुन घेउ नका आणि अन्य कोणाला देउही नका.पराजय स्वीकारा, आपली चुक शोधुन काढा त्यापसुन धडा घ्या आणि पुढे चला. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा त्यापसून मिळणारी शिकवण हरवू देउ नका.

चौथा धडा - मला नम्रपणा आणि विनयाचे महत्त्व कळलंय्.कधीकधी आपल्याला इतके काही मिळतं की खरच आपण यास पात्र आहोत का असा प्रश्न पडतो.यामुळेच कृतज्ञतेची भावना वाढीस लागते.जीवनात बर्‍याच अशा गोष्टी मिळतात की ज्यांच्याबद्दल देवाकडे आभार मानवेच लागतात्.आपले पालक, शिक्षक, जेष्ठ यांनी आपल्यासाठी एवढे काही केलेले असते की त्या उपकाराची परतफेड कधीच शक्य नसतं.या सर्वांचे आभार मानणे गरजेचे असते. काही लोक आपल्या जीवनात आल्याने त्रास होतो, नाही असे नाही परंतु कटु मनाने अशा लोकांपासुन नाती तोडण्यापेक्षा त्यांनी केलेल्या थोड्याफार चांगल्या गोष्टींची आठवण मनात ठेवावी.

पाचवा धडा - नेहमी प्रगतीच्या दिशेने पाउले टाकत रहा. श्रेष्ठत्वाची उपासना करा. हे करण्याचा सोपा मार्ग म्हणजे जे आपल्या पेक्षा पुढे आहेत अशा माणसांचे निरिक्षण करा. त्यांचे अनुकरण करा.कोणी श्रेष्ठता तुमच्यावर थोपु शकत नाही.त्याची आतुन गरज भासली पाहिजे.प्रगती करण्याचे, पुढे जाण्याचे व्यसन जडले पाहीजे.यशाची कल्पना फक्त डोक्यात येउन पुरे नाही तर मन आणि आत्मा सुध्दा त्या एकाच विचाराने भारुन गेला पाहीजे. लक्षात ठेवा खरी स्पर्धा हे तुमची तुमच्याशीच असते.

सहावा धडा - मी शिकलोय की कितिही संकटे आली तरी डगमङुन जाउ नये. हार मानू नये.कोणतेही संकट आधी सांगुन येत नाही.

नैरश्याला बळी पडायचे की धैर्याने आलेल्या परीस्थितिशी दोन हात करावेत हे ठरवा.लक्षात ठेवा प्रत्येक चकाकणार्‍या स्टीलला आधी गरम भट्टीतुन जावेच लागते. माझ्या एका मित्राने सांगीतलेला एक किस्सा
- त्याची आठ वर्षाची मुलगी एकदा जिग सॉ पझल ( कापलेल्या चित्राचे तुकडे जोडुन चित्र पुर्ण करण्याचा खेळ) खेळत होती. तासभर झाला तरी ते कोडे काही सुटत नव्हते. शेवटी झोपण्याची वेळ झाली तेव्हा माझा मित्र बोलला , "सोडुन दे ते आता , मला नाही वाटत की तुला आज तरी हे जमेल." त्याची मुलगी काहीशा विस्मयकारक नजरेने पाहत बोलली , " पप्पा का बरे सोडुन देउ मी? सर्व सुटे भाग तर माझ्याकडे आहेतच. मला फक्त एकत्र जोडायचे आहेत. थोड्या प्रयत्नाने जमेल मला". आपण प्रयत्नांची कास धरुन काम केले तर यश नक्किच मिळते.

सातवा धडा - मला हे जाणवलय की जरी नविन नविन गोष्टींना आपण अत्मसात केले पाहिजे मात्र त्याचबरोबर आपल्या मूळ तत्त्वाना मुरड पडता कामा नये याकडे लक्ष दिले पाहिजे. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे कि मनाची कवाडे उघडी ठेवली पाहीजेत मात्र पाय जमिनीवरुन हलता कामा नये. तुम्ही आपली मूळ तत्त्वे काय आहेत ती वेळिच ठरवुन पुढे आयुष्यभर ती अनुसरणे आवश्यक आहे. आणि हे तितकेसे कठीण काम नाही आहे.

प्रामाणीकपणा, नम्रता, सारासार विचार, मानवता या काही तत्त्वांनी काळाच्या कठीण परिक्षेला मात दिली आही आणि आजही ही तत्त्वे टिकुन आहेत. आणि या सर्व विचारांची खरी व्याख्या शब्दांमधुन नाही तर छोट्या छोट्या कृतींमधुनच कळते.

माणसाची किंमत त्यच्या या तत्त्वांवरूनच ठरते.शॉर्ट कट वापरु नका. शॉर्ट कट मुळे मूळ रस्ताच हरवण्याची शक्यता असते. आणि असे शॉर्ट कट पुढे जाणारा रस्ता अधिक मोठा करणारे ठरतात. आणि शेवटचा धडा जो मी शिकलोय तो म्हणजे आपल्या विचारांवर, कल्पनांवर आणि आदर्शांवर विश्वास ठेवा. कोणी कितिही सांगीतले तरी तो विश्वास ढळू देवू नका.

शेवटी , आपण प्रतिक्रिया देण्यापेक्षा उत्तर ( learn to respond instead of reacting)द्यायला शिकलो पाहीजे. जेव्हा आपण उत्तर देत असतो तेव्हा पुर्ण विचार करुन योग्य तो मार्ग निवडत असतो. आणि त्या वेळेस आपल्यावर फक्त आपले नियंत्रण असते. मात्र जेव्हा आपण प्रतिक्रीया देतो तेव्हा तेच करत असतो जे दुसर्‍या व्यक्तीला आपल्याकडून करवून घ्यायचे असते.

मी तुम्हा सर्वांना पुढील आयुष्यासाठी आणि करीअरसाठी शुभच्छा देतो. मला विश्वस आहे की तुम्ही यशस्वी व्हाल्.कारण ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो तेच यशस्वी होतात.

- विप्रो कॉर्पोरेशन चे चेयरमॅन, अझिम प्रेमजी यांनी ९ फेब्रुवारी २००४ रोजी मुंबई येथे ऑल ईंडीया मॅनेजमेंट असोशिएशन ( All India Management Association (AIMA)) ने आयोजीत केलेल्या "Shaping Young Minds Program" (SYMP)या कार्यक्रमात केलेल्या भाषणाचा अनुवाद.

प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे.कोणी तबला वाजवतो, कोणी वीणा कोणी पेटी तर कोणी सतार.पण प्रत्येकजण एका वाद्यवृंदाचा अविभाज्य घटक असतो.

"Every person is important. It doesn't matter whether you play the violin, the flute, the cello, or the drums; you're still part of the orchestra."*
My lessons in life - Azim Premji My lessons in life - Azim Premji Reviewed by Salil Chaudhary on 22:18 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.