Nothing can stop you from chatting - Meebo.com !


आपल्या सर्वांना चॅटींग करायला फार आवडते. फोनवर असो, मोबाइलवर असो, एस एम एस वर असो किंवा मेसेंजर (Messenger) वर असो आपण चॅटींग करणे सोडत नाही.


पण चॅटींगमुळे खुप वेळ वाया जातो (असे आपल्या बॉसला वाटते!) आणि ऑफीसमध्ये काहीजण (तुम्ही नाही हो , तुमचे सर्व सहकारी !) बॉसबद्दल आणि ऑफीसमधील सुंदर मुलींबद्दल चॅटवर बोलत अगदी ८ तास घालवतात. आणि म्हणुनच बर्‍याच ऑफीसमध्ये Yahoo messenger, Gtalk आणि MSN messenger असे प्रसीद्ध मेसेंजर्स ब्लॉक केले आहेत.
मित्रांनो घाबरु नका. आता कोणीही तुम्हाला चॅटींग करण्यापासून रोखु शकणार नाही अगदी ऑफीसमध्ये सुध्दा ! हे सर्व शक्य झालय Meebo.com मीबो.कॉम मुळे.
मीबो हे एक मोफत ऑनलाइन अप्लिकेशन आहे जे वेगवेगळ्या मेसेंजर क्लायेंट्सवर एकत्रच चॅट करण्याची सुविधा देते.
मीबो संगणकावरुनच नव्हे तर मोबाइलद्वारे देखील वापरता येउ शकते.

एकाच वेळी Yahoo messenger, Gtalk आणि MSN messenger वापरता येते
तुमच्या सर्व मेसेजींगचा डाटा आपोआप सेव्ह केला जातो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मीबो वापरण्यासाठी कोणतेही रजीस्ट्रेशन अथवा डाउनलोड करण्याची आवश्यकता नसते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही साइट मराठी भाषेमध्ये देखील वापरता येइल्.(चित्रात पहा)
मग भेट द्या http://www.meebo.com/ आणि आम्हाला तुमची मते जरुर कळवा.
Nothing can stop you from chatting - Meebo.com ! Nothing can stop you from chatting - Meebo.com ! Reviewed by Salil Chaudhary on 12:18 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.