printwhatyoulike.com - एक पर्यावरण स्नेहीसंपुर्ण जग आता पर्यावरणाचा काळजीपुर्वक विचार करु लागले आहे. आपणही तो केला पाहीजेच. आज मे तुम्हाला ज्या वेब साईट बद्दल सांगणार आहे ती साईट आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी छोटीशी मदत करते.

http://www.printwhatyoulike.com/ (प्रिंट व्हॉट यु लाईक. कॉम - जे हवे आहे तेवढेच प्रिंट करा). ही वेब साईट नावात सांगीतल्याप्रमाणे आपल्याला तेवढेच प्रिंट करण्यास मदत करते ज्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ एखादे वेब पेज छापायचे असेल तर या वेब साईटच्या मदतीने त्यावरील अतीरीक्त चित्रे, जाहीराती, अनावश्यक मजकुर इत्यादी काढुन टाकता येतो. यामुळे कागद वाचतो, शाई वाचते आणि पर्यायाने पर्यावरणाची होणारी हानी वाचवता येते.

printwhatyoulike.com चे फायदे काय आहेत?
  • वेब साईटवर जा. जे पान छपायचे आहे त्याची वेब लिंक (web page address/URL) लिहा आणि सुरुवात करा. काहीही डाउनलोड करावयाची आवश्यकता नाही.
  • पानावरील जाहीराती, अनावश्यक चित्रे ईत्यादी मजकुर काढुन टाकता येतात. त्यामुळे मजकुर व्यवस्थीत वाचता येतो.
  • पानावरील चित्रे कमी केल्यांमुळे छपाई साठी लागणार्‍या शाईची बचत होते.
  • समासाची मोकळी जागा भरुन एकाच पानावर जास्त मजकुर छापता येतो. त्यामुळे कागद वाचविता येतो.
  • असे सुधारीत आणि मोकळे पान HTML अथवा PDF या फोर्म्याट मध्ये सेव्ह करुन ठेवता येते.

printwhatyoulike.com कसे वापरावे?
  • वेब साईटवर जा. जे पान छपायचे आहे त्याची वेब लिंक (web page address/URL) लिहा आणि सुरुवात करा
  • जो भाग छापावयाचा आहे तो सीलेक्ट करा.आणि प्रिंट किंवा सेव्ह करा.
  • पानावरील अनावश्यक मजकुर तुम्ही स्वतः वेगळा करु शकता किंवा या वेब साईट वरील "Do it for me" हे बटण वापरुन ऑटोमॅटीकली ते करुन घेउ शकता.
printwhatyoulike.com - एक पर्यावरण स्नेही printwhatyoulike.com - एक पर्यावरण स्नेही Reviewed by Salil Chaudhary on 11:20 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.