ऑफीसमध्ये ऑर्कुट उघडण्याचे सोपे उपाय !

बरेच लोक इंटरनेट फक्त ऑफीसमध्येच वापरतात. (घरी कंप्युटर नसतो, असला तर इंटरनेट घेतलेला नसतो, इंटरनेट असलाच तर तो डाउन असतो आणि या तीनही गोष्टी सुदैवाने असल्याच तर लोड शेडींग असतंच ! वा रे भारतीय आय. टी. ) असो सांगायचा मुद्दा हा की बरेच जणांचा इंटरनेटशी संबंध फक्त ऑफीसमध्येच येतो. आणि बर्‍याच वेळा ऑफीसेसमध्ये काही अप्रतीम साईटस (ज्यांच्यामुळे इंटरनेट एक छान अनुभव बनला आहे) अशा साइटस ब्लॉक केलेल्या असतात. म्हणुनच ऑर्कुटच्या जगाशी बरेच लोक अजुनही दुर आहेत.

(प्रस्तावना संपली एकदाची !)


मित्रहो आज मी तुम्हाला ऑफीसमध्येच ऑर्कुट ही वेब साईट कशी पहायची त्याचे काही सोपे उपाय सांगणार आहे. अशा ब्लॉक केलेल्या साईट्स पाहण्यासाठी खरेतर खुप उपाय आहेत. पण ते सगळे थोडेशे किचकट आहेत. आणि बरेचशे बेकायदेशीर मार्ग आहेत. म्हणुन मी तुम्हाला अगदीच सोपे आणि निरुपद्रवी मार्ग सांगणार आहे.

पहीला उपाय -

बर्‍याच ठीकाणी
http://www.orkut.com/ हे संकेतस्थळ बंद केलेले असते, त्याऐवजी http://www.orkut.co.in/ हे ऑर्कुटचे भारतीय रुप वापरुन पहा.

दुसरा उपाय -

http://www.power.com/ अथवा http://www.powerscrap.com/ चा वापर करा. या संकेतस्थळाचा वापर करुन तुम्हाला ऑर्कुटमध्ये लॉग्-इन (Login) करता येइल.


हे दोनही अतीशय साधे उपाय आहेत. सगळयाच ठीकाणी काम करतील असे नाही. पण तुम्हाला वर उल्लेखीलेल्या काही हमखास (जालीम) उपायांची माहीती हवी असेल तर मला कळवा. सोबत तुमचा इ-मेल आयडी देण्यास विसरु नका. कारण ते उपाय netbhet.com वर येणार नाहीत , तुम्हाला मेल मात्र जरुर करेन.
ऑफीसमध्ये ऑर्कुट उघडण्याचे सोपे उपाय ! ऑफीसमध्ये ऑर्कुट उघडण्याचे सोपे उपाय ! Reviewed by Salil Chaudhary on 06:39 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.