स्वतःचे होमपेज बनवा ! Groovle.com

आपल्या सर्वांच्याच संगणकावर एखादा सुंदर डेस्कटॉप वॉलपेपर असतो. एखादे सुंदर चित्र, किंवा आपलाच एखादा फोटो , एखादे स्फुर्तीदायी वाक्य असलेला वॉलपेपर ठेवायला आपल्याला नेहमीच आवडते. पण होते काय संगणक चालु केल्यानंतर काही वेळातच तो वॉलपेपर दृष्टीआड होतो आणि त्याची जागा आपले होमपेज घेते. (आणि बर्‍याच जणांचे होमपेज पांढरे शुभ्र गुगल असते !)

तर आज मी एका अशा साईटशी तुमची ओळख करुन देणार आहे की जी तुम्हाला या दोन्ही गोष्टी एकत्र करुन देते. म्हणजेच आपण आपल्या आवडत्या चित्रामध्येच गुगल सर्च वापरु शकतो आणि त्यालाच होमपेज करु शकतो. या साईटचे नाव आहे Groovle (ग्रुव्हल.कॉम)

ग्रुव्हल वापरण्यास अतीशय सोपी आहे. मला ही साईट खुप आवडली पण एका वेगळ्याच कारणासाठी. ते मी तुम्हाला सांगेनच पण त्याआधी ग्रुव्हल.कॉम काम कशी करते ते पाहुया.

ग्रुव्हल.कॉम वर कोणतेही लॉग्-इन करण्याची आवश्यकता नाही. ग्रुव्हल वर जाताच उजव्या बाजुला खाली Browse आणि upload चा पर्याय दीलेला आढळुन येइल. हा पर्याय निवडुन तुम्ही तुमच्या आवडत्या चित्राचे गुगल सर्चपेज बनवु शकता.

दुसरा पर्याय साईटच्या उजव्या बाजुला खाली आढळुन येईल. ईथे विविध प्राण्यांची , नीसर्गाची, अवकाशाची आणि सिने तारकांची चित्रे दीलेली आहेत. त्यामधील आपले आवडते चित्र निवडा आणि मग त्याचे गुगल सर्च पेज मध्ये रुपांतर करा.

या होमपेजची लिंक तुमच्या ईमेल आयडीवर पाठवण्याची सोय देखील आहे. ती वापरुन तुम्ही आपल्या मित्रांनाही हे वेबपेज पाठवु शकता.

पहा मी बनवीलेली काही ग्रुव्हल सर्च पेजेस ! (वाघाचे चित्र ग्रुव्हल.कॉम वरुन घेतले आहे तर शिवरायांचे चित्र माझ्या कंप्युटरवरुन)


मला खात्री आहे की तुम्हाला ग्रुव्हल.कॉम नक्कीच आवडली असणार.

आता तुम्हाला सांगतो की मला ग्रुव्हल.कॉम का आवडली ते. या वरवर साध्या वाटणार्‍या साईटमध्ये एक जबरदस्त बीझनेस आयडीया लपली आहे. गुगल मध्ये एक कस्टम सर्चचा पर्याय असतो. कस्टम सर्च म्हणजे गुगलचे सर्च आपल्या साइटवर वापरण्याची सुविधा. आणि जेव्हा एखाद्या साईटचे वाचक ही सुविधा वापरुन सर्च करतात तेव्हा गुगल त्या साईटला याचे पैसे देते.

ग्रुव्हल.कॉम नेमकी याच प्रकारे पैसे कमावते. तुम्ही ग्रुव्हल.कॉम ला होमपेज बनवलेत की पुन्हा त्यावरुन केलेल्या सर्व सर्चसाठी गुगल ग्रुव्हल.कॉमला पैसे देणार !

आहे की नाही भन्नाट आयडीया ! अशीच आयडीया आणखीन एका साईटने गुगल कस्टम सर्चच्या बाबतीत वापरली आहे. सांगा पाहु कोणती ते!

मी सांगेन पुढच्या एखाद्या लेखात :-)

स्वतःचे होमपेज बनवा ! Groovle.com स्वतःचे होमपेज बनवा !  Groovle.com Reviewed by Salil Chaudhary on 07:35 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.