Good news for all bloggers !

ब्लॉगर.कॉम आणि वर्डप्रेस्.कॉम हे ब्लॉगींगसाठी उपलब्ध असलेले सर्वोत्तम पर्याय आहेत. या दोन साइट्स मुळे ब्लॉगींग अस्तीत्वात आहे असे म्हणायला हरकत नाही. पण एखाद्या नवीन ब्लॉगरला या दोन साइट मधुन एक पर्याय निवडणे मात्र खुप कठीण जाते. दोन्ही साईटस तशाच तुल्यबळ आहेत.

वर्डप्रेस खुपच विचारपुर्वक बनवण्यात आलेली सुबक आणि सुरेख साइट आहे तर ब्लॉगर ही वापरण्यास अतीशय सोपी अशी ब्लॉगींग साइट आहे. वेब डीझाइनर्सना विचाराल तर ते नेहमीच वर्डप्रेस ला पसंती देतात. कारण टेक्निकली वर्डप्रेस सरस आहे.

पण वर्डप्रेसमध्ये दोन प्रमुख उणीवा आहेत. वर्डप्रेस खुपच कमी टेम्प्लेट्स (म्हणजे ब्लॉगच्या डीझाइन्स) उपल्ब्ध करुन देते आणि ब्लॉगर.कॉम प्रमाणे यात डीझाइन्स मध्ये बदल करण्याची किंवा नविन विजेट्स अंतर्भुत करण्याची सोय देखील नसते. आणि दुसरी उणीव म्हणजे ब्लॉगर्.कॉम प्रमाणे यात जाहीरातींचा वापर करता येत नाही. ब्लॉग मधुन पैसे मिळवण्याची इच्छा असणार्‍यांचा (माझ्यासारख्या) यामुळे हिरमोड होतो.

पण तरीदेखील वर्डप्रेस वापरण्याची सवय असलेल्या कोणालाही दुसरी कोणतीही ब्लॉगसर्वीस वापरणे आवडत नाही. अशा सर्व ब्लॉगधारकांसाठी एक असा उपाय अस्तीत्वात आहे कि जो ब्लॉगर आणि वर्डप्रेस या दोघांचाही सुवर्णमध्य गाठतो.

होय, एक अशी ब्लॉगींग सर्वीस उपल्ब्ध आहे की जी वर्डप्रेसचा इंटरफेस आणि टेक्नॉलॉजी वापरते, ब्लॉगरप्रमाणे गुगल अ‍ॅडसेन्स उपलब्ध करुन देते आणि काही नविन, फ्रेश टेम्प्लेट्सही देते. इतकच नव्हे तर आपल्या ब्लॉगसाठी SEO (सर्च इंजीन ऑप्टीमायझेशन) देखील करते. सर्च इंजीन ऑप्टीमायझेशन म्हणजे गुगल, याहु , आस्क्.कॉम सारख्या साइट्सवर आपल्या ब्लॉगवरील नोंदी अधीकाधीक पुढे दीसाव्यात यासाठी ब्लॉगच्या कोडमध्ये केले जाणारे छोटे छोटे बदल. थोडक्यात सर्च इंजीनद्वारे येणारी ब्लॉगची ट्रॅफीक वाढावी यासाठी केले जाणारे प्रयत्न म्हणजे SEO.

या साइटबद्दल सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे ही चक्क भारतीय साइट असुन भारतीय भाषांमध्ये ब्लॉगींगची सुवीधा उपलब्ध करुन देते. वाचक देखील भारतीय भाषांमध्ये आपल्या प्रतीक्रीया नोंदवू शकतात.

तर अशा या बहूउपयोगी साइटचे नाव आहे blog.co.in

blog.co.in चे काही फीचर्स - (Features)

CO.CC:Free Domain

- केवळ काही सेकंदातच ब्लॉग सुरु करा (It only takes seconds and is FREE)

- एकापेक्षा जास्त ब्लॉग सुरु करता येतात आणि एकापेक्षा जास्त ब्लॉग लेखक नेमता येतात. (Multiple Blogs and Multiple Authors)

- खुप सुंदर ब्लॉग थीम्स (Lots of Gorgeous Themes)

- ब्लॉगपोस्टस बरोबर ब्लॉग पेजेस देखील उपल्ब्ध. तुमच्या ब्लॉगला यामुळे वेबसाइटचे रुप देता येइल. (Manage Regular Pages, not Just Blog Posts)

- फोटो, व्हीडीओ, फ्लॅश मुव्हीज, स्पेलींग चेक आणि इतर अनेक सुविधा (Spell-check, Previews, Autosave, Words, Photos, Videos)

- सध्याच्या ब्लॉगर, टाइपपॅड, लाइव्ह जर्नल आणि इतर अनेक ब्लॉग इंपोर्ट करता येतात (Import from Blogger, TypePad, LiveJournal, and More)

- दर आठ तासांनी ब्लॉगचा बॅक-अप घेतला जातो. (Backups for every 8 Hours)

- 99.99% Up-Time

- जाहीरातींद्वारे पैसे कमवता येतात. (Earn Money from Ads)

Note - तुमच्या ब्लॉगवर दाखवील्या जाणार्‍या अ‍ॅड्स पैकी ४०% अ‍ॅड्स या blog.co.in च्या असतात आणि ६०% अ‍ॅड्स तुमच्या. म्हणजेच जाहीरातींद्वारे येणार्‍या उत्पन्नाच्या ६०% तुम्हाला मिळतात. वर्डप्रेस वर काहीच न कमावण्यापेक्षा हे केव्हाही चांगलेच ! आणि SEO मुळे जवळपास ब्लॉगरवर मिळणार्‍या उत्पन्नाइतकेच ब्लॉग्.को.इन चे उत्पन्न असते.

यालाच म्हणतात win-win situation !

ब्लॉग्.को.इन (Blog.co.in) वरील माझ्या ब्लॉगला भेट द्या -

http://www.salilpro.co.cc/

http://www.netbhet.co.cc/

तुमचे अभिप्राय कळवण्यास विसरु नका !

Good news for all bloggers ! Good news for all bloggers ! Reviewed by Salil Chaudhary on 23:53 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.