Handwriting fonts style

इंटरनेटवरच्या माझ्या मुशाफीरीमध्ये दररोज काहीतरी नवं सापडते. इंटरनेट सर्फींग म्हणजे अगदी समुद्रमंथनासारखी आहे.

असचं एका कामासाठी मी काही फाँट्स शोधत होतो. तेव्हा माझ्या हाती लागले काही असे फाँट्स जे चक्क हस्ताक्षरासारखे असतात (पण केवळ इंग्रजीतच :-0). म्हणजे या फाँट्समधुन लिहिले की मशीनची लीपी न वाटता कोणीतरी स्वतःच्या हाताने लिहिल्यासारखे वाटते.

मी लगेचच ते फाँट्स डाउनलोड करुन घेतले (त्याबाबतीत मी खुपच तरबेज आहे!). आणि लिहुनही बघीतले. तुम्हीपण बघा कसे दीसतात ते. मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडतील.

नेटभेटच्या वाचकांसाठी मी हे फाँट्स इ-स्निप्स (esnips.com) या माझ्या आवडत्या साईटवर अपलोड करत आहे.

तुम्ही या लिंकवर क्लिक करुन ते डाउनलोड करु शकता. ( थोडेथोडके नाहीत, तब्बल १०१ फाँट्स आहेत.)

फाँट्स इंस्टॉल कसे करावेत -

पहील्यांदा फाँट्स असलेला फोल्डर संगणकावर कॉपी करुन घ्यावा.
त्यानंतर Start > settings > control panel येथे जावे.
फाँट्स (Fonts) असे लिहिलेला फोल्डर दीसेल. तो उघडावा.
या फोल्डरमध्ये तुम्ही सध्या वापरत असलेले सर्व फाँट्स फाइल दीसतील.
फोल्डरमध्ये वरच्या बाजुला File असे लिहिलेला टॅब असेल तो सीलेक्ट करा.( Alt बटण दाबल्यास आपोआप File टॅब सीलेक्ट होतो. आठवा आपले कीबोर्ड शॉर्टकट्स!)

File > install new fonts असा पर्याय दीसेल. तो नीवडावा.

खाली दाखवील्या प्रमाणे जीथे फाँट्सचे फोल्डर सेव्ह(Save) केले आहे ती जागा निवडावी.
त्यानंतर वरील चित्रात दाखवीलेले Select all आणि OK हे बटण दाबावे.
हे नविन फाँट्स भराभर इन्स्टॉल होतील आणि लगेचच तुम्ही ते वापरुही शकता.
Handwriting fonts style Handwriting fonts style Reviewed by Salil Chaudhary on 07:59 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.