की बोर्ड शॉर्ट कट्स वापरुन आपला बहुमोल वेळ वाचवा !

नविनच कंप्यूटर शीकणार्‍यांसाठी माउस खुप उपयोगाचा आहे. पण जस जसे तुम्हे "Pro" म्हणजेच प्रोफेशनल होउ लागता तसतसे की-बोर्डसचा अधीकाधीक वापर करणे आवश्यक होउ लागते. की-बोर्ड वरचे शॉर्ट कट्स वापरल्याने अधीक वेगाने काम करता येते.

नेटभेटच्या माध्यमातुन मी की-बोर्डसच्या विविध शॉर्ट कट्स बद्दल सांगणार आहे. कारण नेटभेटचा प्रत्येक वाचक केवळ संगणक साक्षर बनून न राहता संगणक विषयात कुशल झाला पाहीजे हीच आमची मनीषा आहे.

आज या मालीकेतील पहील्या लेखामध्ये अशाच काही वेळ वाचवणार्‍या टीप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तसं म्हंटले तर या टीप्स थोड्या अ‍ॅडव्हान्स आहेत असे म्हणता येतील. पण मी असे धरून चाललो आहे की काही बेसीक की-बोर्ड शॉर्ट कट्स वाचकांना अवगत असतील. जर तुम्हाला अगदी बेसीक टीप्स देखील हव्या असतील तर कृपया खाली कंमेंट्समध्ये तसे लिहुन आम्हास कळवा.

  • संगणकावर बर्‍याचदा विविध प्रोग्राम्स्/ विंडोज मध्ये एकाच वेळी काम करावे लागते. अशा वेळी एका विंडो मधुन दुसर्‍या विंडो मध्ये जाताना सतत माउस ने त्या त्या विंडोच्या चिन्हावर क्लिक करावे लागते. यामध्ये बराच वेळ जातो. त्यापेक्षा जर की- बोर्ड वरील "Alt + Tab" ही बटणे एकत्र दाबली तर अगदी सहजगत्या चालु असलेल्या सर्व प्रोग्राम्स मध्ये फीरता येते. प्रत्येक प्रोग्राम मधुन जाण्याकरीता Alt हे बटण दाबुन ठेवावे आणि आपल्याला हवी असलेली विंडो येइपर्यंत Tab बटण दाबत रहावे.

वापरुन पहा एकदा. मी पैज लावुन सांगतो की पुन्हा या कामासाठी तुम्ही माउसला पुन्हा हात लावणार नाही.

  • संगणकावर चालु असलेली विंडो अथवा प्रोग्राम जर बंद (Close) करायचा असेल तर "Alt + F4" एकत्र दाबावे. समोर चालु असलेला कार्यक्रम त्वरीत बंद होतो.

आणि चालु असलेला प्रोग्राम/ विंडो तात्पुरती लहान (Minimize) करावयाची असेल तर "Alt + space + N" दाबावे.

बर्‍याचदा ऑफीसमध्ये किंवा कधी कधी घरी देखील संगणकावरील काही काम लपुन छपुन करावे लागते. (मी जास्त स्पष्टीकरण देत नाही, सुज्ञ वाचक जाणतीलच अशी अपेक्षा आहे.) अशा वेळेस कोणी आल्यास आपण काम करत असलेली विंडो त्वरीत बंद करावी लागते. यासाठी वर दील्याप्रमाणे "Alt + Tab" हा उपाय आहेच पण त्यासोबत एक दुसरा पर्यायही उपलब्ध आहे. तो म्हणजे "Windows key+M".

Windows key (विंडोज की) म्हणजे की बोर्डच्या डाव्या बाजुला ctrl (Control) आणि Alt या बटणांच्या मध्ये असलेले आणि मायक्रोसॉफ्टचा लोगो असलेले बटण.)

  • "windows key + M" हे बटण दाबताच सर्व प्रोग्राम एका क्षणात अद्रुश्य होतात आणि केवळ डेस्कटॉप दीसु लागतो.
  • आता लहान केलेल्या (Minimize) केलेल्या सर्व विंडोज पुन्हा एकत्र उघडण्यासाठी "Windows key+Shift+M" एकत्र दाबा.

मला आशा आहे की हे सर्व शॉर्ट कट तुम्हाला नक्की आवडतील आणि उपयोगी ठरतील. या लेखास आपला प्रतीसाद देण्यास विसरु नका.

की बोर्ड शॉर्ट कट्स वापरुन आपला बहुमोल वेळ वाचवा ! की बोर्ड शॉर्ट कट्स वापरुन आपला बहुमोल वेळ वाचवा ! Reviewed by Salil Chaudhary on 11:37 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.