THIRST - World's best presentation 2008

मला इंटरनेटवर रोज काहीतरी नवीन शोधण्याची खोड आहे. खरेतर रोजच्या जीवनात कुठेतरी संगणकावर काम करण्याबाबत काही अडचणी येतात आणि त्या सोडवण्याच्या नादात मी रोज काही नविन शिकुन घेतो. असचं एका मित्राला मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट बद्दल काही मदत हवी होती , ती शोधण्यासाठी मी गुगल काकांकडे गेलो आणि तेथे मला एक अफलातुन पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मिळाले.

या प्रेझेंटेशनला २००८ सालाचे जगातील सर्वोत्कृष्ट प्रेझेंटेशन म्ह्णणुन निवडले गेले आहे. www.slideshare.com या साईटवर उपलब्ध असलेले हे प्रेझेंटेशनचे नाव आहे Thirst म्हणजे तहान.

जगातील पाण्याच्या समस्येवर चपखल भाष्य करणारे हे प्रेझेंटेशन बनवले आहे अपोलो आयडीयाज (www.apolloideas.com) या कंपनीने आणि ते डीझाइन केले आहे जेफ ब्रेनमॅन यांनी.

६५ स्लाइड्स असलेले हे प्रेझेंटेशन पाहुन जगातील पाण्याच्या समस्येचा अंदाज येतो आणि उद्याची काळजी वाटू लागते. जगातील पुढचे महायुद्ध पाण्यासाठीच होईल असे म्हंटले जाते. हे प्रेझेंटेशन पाहुन असे का म्हणतात ते कळते.

बघा, विचार करा आणि कृती करा. प्रेझेंटेशनची मांडणी आणि वापरलेली चित्रे परीणामकारक आहेतच पण त्यासोबत दीलेला संदेशही तीतकाच महत्त्वाचा आहे.

THIRST - World's best presentation 2008 THIRST - World's best presentation 2008 Reviewed by Salil Chaudhary on 21:00 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.