A 9 Year Old CEO and web designer !


आजचा लेख एका असामान्य बुध्द्धीमत्ता आणि विशेष कौशल्य लाभलेल्या मुलीबद्दल आहे. पण तीच्याबद्दल काही वाचण्याआधी BarCouncilKerala.com या वेबसाइटला भेट द्या.

आता मी तुम्हाला तीच्याबद्दल सांगतो. या मुलीचे नाव आहे श्रीलक्ष्मी सुरेश. केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यात राहणार्‍या या ९ वर्षाच्या चिमुरडीने ही साइट बनवीलेली आहे. केरळबारकॉन्सील्.कॉम या कायदेवीषयक वेबसाईटचे डीझाइन करणार्‍या इ-डीझाइन या कंपनीची ती सीईओ CEO देखील आहे. श्रीलक्ष्मीने यापुर्वीच १० वेबसाइट्स बनवील्या आहेत यामध्ये तीच्या शाळेची आणि कर्णबधीर मुलांसाठी बनवीलेल्या साईटचा समावेश आहे.

श्रीलक्ष्मीने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. असोसीएशन ऑफ अमेरीकन वेबमास्टर्स या संस्थेची ती १८ वर्षाखालील वयाची एकमेव सभासद आहे. आणि या संस्थेने तीला सर्वोच्च अशा गोल्ड वेब अ‍ॅवॉर्डने पुरस्कृत केले आहे. एवढेच नाही तर या असामान्य मुलीला इन्फोगृप (Infogroup) या कंपनीनी आपली ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर म्हणुन निवडले आहे.

हा लेख लिहिण्यामागचा उद्देश हा एवढेच सांगण्याचा आहे की यश मिळवण्यासाठी कधीही वय मध्ये येत नाही. तुम्ही १५ वर्षाचे असा किंवा ५० वर्षाचे, यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत आणि जिद्दी वृत्ती या दोनच गोष्टींची आवश्यकता असते.This post is about a Miracle girl in Kerala.
Before reading further about her visit this weblink BarCouncilKerala.com .

Now I will tell you about Sreelakshmi Suresh, a nine-year-old girl from Kozhikode district in Kerala and CEO of the web designing company eDesign. She is the designer of the website you had just visited. This website is aimed at helping poor people by providing free support in legal matters.

Sreelakashmi has already developed more than 10 websites. She had also designed one for her school and one for deaf people.She has won several National and International Awards for her excellence in web designing.Sreelakshmi is the only member of the Association of American Webmasters, under the age of 18.

Association of American Webmasters has honoured Sreelakshmi Suresh by giving her their membership along with their highest award for excellence in web designing, the Gold Web Award.

This brilliant child has been appointed as the Brand Ambassador of InfoGroup, a group of companies and Director of YGlobes Technologies.

The intent of this post is to give a message that success in any field does not depend on age. It does not matter whether you are 15 years or 50 , what matters is the talent and perseverance to achieve success.

Source - (Sify/alootechie)
click here
A 9 Year Old CEO and web designer ! A 9 Year Old CEO and web designer ! Reviewed by Salil Chaudhary on 07:07 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.