Keyboard short cuts for Microsoft Word

click here

की बोर्ड शॉर्टकट्स - मायक्रोसॉफ्ट वर्ड

आपण आधीच्या लेखांमध्ये संगणकावर तसेच मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये काम करताना उपयोगी ठरणारे शॉर्टकट्स पाहीले. आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सहजगत्या काम करण्यासाठी आवश्यक असणारे काही शॉर्टकट्स.
आधीच्या लेखांप्रमाणेच काही निवडक आणि सहसा कोणाला माहीत नसलेलेच शॉर्टकट्स आपण येथे पाहणार आहोत.

 1. एखाद्या मोठ्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये काम करताना जर सर्वात पहील्या ओळीवर अथवा सर्वात शेवटच्या ओळीवर जायचे असेल तर अनुक्रमे ctrl + Home आणि ctrl + End दाबावे.
 2. लिहिलेल्या मजकुराला अधोरेखीत (Underline) करायचे असल्यास ctrl + U दाबावे हे आपल्याला माहीत असेलच पण जर त्याच मजकुरास दोनदा अधोरेखीत (Double underline) करायचे असेल तर त्या मजकुरास सीलेक्ट करुन Ctrl + Shift + D दाबावे.
 3. मजकुराची मुद्देसूद मांडणी करताना बुलेटींग करावे लागते. अशा वेळेस सर्व मुद्दे एकाखाली एक असे मांडुन घ्यावेत आणि मग त्यांना एकत्र सीलेक्ट करुन Ctrl + Shift + L एकत्र दाबावे.
 4. कधी एखादा कॅपीटल मधील मजकुर स्मॉल लेटर्स मध्ये किंवा स्मॉल लेटर्स मधील मजकुर कॅपीटल मध्ये बदलावा लागतो. यासाठी आधी तो मजकुर सीलेक्ट करुन मग Shift+F3 दाबावे.
  - Shift+F3 एकदा दाबल्यावर सर्व मजकुर कॅपीटल मध्ये रुपांतरीत होतो
  - Shift+F3 दुसर्‍यांदा दाबल्यावर सर्व मजकुर स्मॉल मध्ये रुपांतरीत होतो
  - Shift+F3 तीसर्‍यांदा दाबल्यावर सर्व शब्दांचे पहीले अक्षर कॅपीटल मध्ये आणि इतर सर्व अक्षरे स्मॉल मध्ये रुपांतरीत होतात.
 5. मायक्रोसॉफ्ट एक्सेल प्रमाणेच वर्ड मध्ये देखील कॉलम्स लपलेले असतात. वर्ड मधील कॉलम सीलेक्ट करायचा असेल तर Alt बटण दाबुन ठेवावे आणि सोबत माउसच्या डाव्या बटणाच्या सहाय्याने ड्रॅग करावे.

अजुन खुप शॉर्टकट्स आहेत. नंतर सवडीने सांगेन पण त्याआधी आजच्या लेखातील शॉर्टकट्सचा सराव करायला घ्या.

Key Board short cuts for Microsoft Word.

In our earlier "Keyboard short cuts series" we have learned about shortcuts to speed up your work on PC and microsoft excel. Today we are going to have alook at some keyboard short cuts for wroking smartly on microsoft word.

Simillar to earlier articles, even in this articles we shall talk about some selected and less known shortcuts.

 1. While working on a lenghty word document if you want to navigate to extreme ends (Start and end) of documents then use ctrl + Home and ctrl + End respectivly.
 2. We all know that using ctrl + U shortcut, selected matter can be underlined. But if you want to double underline the content of a document then simply select the area and press Ctrl + Shift + D.
 3. For applying list bullets to a particular matter, write all points first. Then select all points and press Ctrl + Shift + L simultaneously.
 4. To convert content from CAPITAL to SMALL letters or vice versa use a key combination of Shift+F3
  Shift+F3 when pressed once - CONVERTS ALL LETTERS TO CAPITAL
  Shift+F3 when pressed twice - converts all letters to small
  Shift+F3 when pressed thrice - Converts Starting Letters Of All Words To Capital And All Other Letters To Small
 5. Do you know like in excel colmns are also present in microsoft word. To select colomns in Microsoft words, keep Alt button pressed and drag with mouse.

I hope you will find these shortcuts useful. Practise this short cuts in daily work and then soon you will become a Microsft Word wizard.

Keyboard short cuts for Microsoft Word Keyboard short cuts for Microsoft Word Reviewed by Salil Chaudhary on 12:23 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.