ऑनलाइन चित्रकला - स्केचकास्ट.कॉम !


आपण इंटरनेटवर बर्‍याच प्रकारे संवाद साधत असतो. त्यासाठी आपण इमेल,प्रेझेंटेशन्स, चित्रे, ईंस्टंट मेसेंजर, ब्लॉग्स, मोव्ही क्लिप्स इत्यादी अनेक प्रकार वापरतो. पण इतकी सगळी साधने हाताशी असताना देखील कधी तुम्हाला पेन आणि पेपरची उणीव जाणवली आहे का? कधी असे वाटले आहे की इंटरनेटवर एखाद्याशी संवाद साधताना अगदी कागदावर लिहुन अथवा चित्रे काढुन दाखवले असते तर किती सोपे झाले असते. आणि तुम्हाला कधी असे वाटले असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी आहे.


मला एक अशी वेबसाईट सापडली आहे जी एका वेगळ्याच प्रकारचे संवादाचे साधन उपलब्ध करुन देते. ही वेबसाईट इंटरनेट वरील पेन आणि पेपरचे काम करते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तुम्हाला जे समजावुन सांगायचे आहे ते इथे चित्र काढुन किंवा लिहुन सांगता येते. त्याचप्रमाणे सोबत ऑडीओ म्हणजे तुमचा आवाज रेकॉर्ड करण्याची सोय देखील आहे. बघणार्‍यांसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे काय लिहिले आहे किंवा कोणते चित्र काढले आहे ते तर समजतेच पण कसे काढले आहे हे देखील पाहता येते.


या साइटचे नाव आहे sketchcast.com स्केचकास्ट.कॉम. इथे मोफत (Free account) सुरु करा आणि माउसच्या सहाय्याने तुमच्या कल्पनाशक्तीला कागदावर (म्हणजे कंप्युटरच्या स्क्रीनवर) उतरवा.


मी काय म्हणतोय ते कदाचीत तुम्हाला कळले नसेल तर खाली दीलेले व्हीडीओ पहा. पहीली दोन गणएशाची चित्रे मी काढलेली आहेत. (माझ्या चित्रकलेवर तुमचे अभिप्राय नक्की कळवा!) आणि माझी चित्रे पाहुन तुम्ही फारसे आकर्षीत झाला नसाल तर तिसरे चित्र पहा जे स्केचकास्ट वर एका कलाकाराने काढलेले मला आढळले.


या साइटच्या सहाय्यने मी माझ्या ३ वर्षाच्या भाचीबरोबर कित्येक तास खेळलो, मी एखादे चित्र काढायचो आणि मी कोणते चित्र काढतो आहे हे ती ओळखायची. तिलादेखिल ही साइट खुप आवडली.We communicate on internet in many different ways. We use emails, pictures, slideshows, messengers, podcasts, movie clips and so on. The list is never ending. But inspite of all this tools at help, have you ever felt a need of a pen and paper? Have you ever thought about how easy it would be to explain things , if you could draw something on paper and show it to the person on the other end? If you ever felt the need of PEN and PAPER while communicating on internet, then this article is for you.


I came across one unique way of communication on internet. It is a webservice that becomes your pen and paper on internet. I am talking about sketchcast.com Sketchcast.com is a tool that allows you to draw and record what you’re drawing, with the idea that the visualizations can help you communicate your ideas. And watching someone draw does help everyone else see and understand their thought process. You need to see one or create one if you have to believ it. Go to sketchcast.com, create your account for free and start drawing your imagination with your mouse. I created my account here and created few


drawings. Check them out.
And if you are not much impressed with my work. Then here is a great piece of art by one of the member of sketchcast.com (http://sketchcast.com/channel/Kreed/)


With this help of this tool, I entertained my 3 year old niece for hours. I used to start drawing a shape and she tried to recognize that shape. Even she likes it a lot.

ऑनलाइन चित्रकला - स्केचकास्ट.कॉम ! ऑनलाइन चित्रकला - स्केचकास्ट.कॉम ! Reviewed by Salil Chaudhary on 06:55 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.