Check a specific spot in youtube video

युटयुब (Youtube.com) या साइटवरील व्हीडीओज आणि मुव्हीज आपल्या पीसीवर डाउनलोड कसे करायचे हे आपण मागील एका लेखात पाहीले. आज युट्युबशीच निगडीत आणखी एक टीप मी आपल्याला सांगणार आहे.

युट्युबवरील व्हीडीओज आपण बर्‍याचदा मित्रमंडळींमध्ये शेअर करत असतो. अशावेळेस इ-मेल मध्ये एखाद्या व्हीडीओची URL म्हणजेच वेब अ‍ॅड्रेस पाठवतो. पण जर कोणाला युट्युब व्हीडीओ मधील एखादा वीशीष्ट भागच पहायचा असेल किंवा दाखवायचा असेल तर? याचीच एक भन्नाट टिप मी आज वाचकांना देणार आहे.

युट्युब वरील व्व्हीडीओज बफर (Buffering Time - व्हीडीओ इंटरनेटवर सुरु होण्यासाठी लागणारा वेळ) होण्यास लागणारा वेळ लक्षात घेता आजची ही टिप किती उपयुक्त आहे हे तुम्हाला कळले असेलच.

समजा तुम्हाला जो व्हीडीओ पहायचा आहे त्याची URL पुढीलप्रमाणे आहे.

http://www.youtube.com/watch?v=MtirDMfcOKE&feature=channel

आणि तुम्हाला हवा असलेला भाग व्हीडीओ सुरु केल्यापासुन १ मिनिट १५ सेकंदांनी सुरु होतो. मग फक्त वरील URL च्या पुढे #t=01m15 असे लिहा (मध्ये स्पेस देउन)आणि एंटर करा.

http://www.youtube.com/watch?v=MtirDMfcOKE&feature=channel #t=01m15

(01 म्हणजे मिनिटे. आधी शुन्य लिहायला विसरु नका. m म्हणजे मिनिटे आणि 15 म्हणजे सेकंद)

आता ही URL कोणालाही पाठवा. अगदी तुम्हाला हव्या असलेल्या भागापासुनच व्हीडीओ सुरु होइल.
Check a specific spot in youtube video Check a specific spot in youtube video Reviewed by Salil Chaudhary on 20:45 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.