Simplest weather report ever - Umbrellatoday.com

पुर्वी दूरदर्शनवर बातम्यांचा कार्यक्रम असायचा (तसा आताही असतो पण दूरदर्शनचं 'दर्शन'च दुर'लभ झालय हल्ली). या बातम्यांच्या शेवटी नेहमी चार प्रमुख शहरांचे कमाल आणि किमान तापमान सांगीतले जायचे तसेच हवामानाचा अंदाजही दीला जायचा. पण तेव्हा माझ्या बाल मेंदुला हे कळत नव्हते की रोज रोज तापमान किंवा हवामानाबद्दल जाणुन घेण्यात कोणाला रस असेल? माझ्या बाबांनी एकदा मला सांगीतले होते की शेतकर्‍यांना , मासेमारीसाठी समुद्रात जाणार्‍या कोळ्यांना तसेच पर्यटकांना या माहीतीचा उपयोग होतो. पण तरीसुद्धा माझे समाधान झाले नव्हते. मला तर ही माहीती अनावश्यक आहे असेच वाटायचे.

मी हे तुम्हाला का सांगतोय माहीत आहे का? कारण मला एक असे वेब अप्प्लिकेशन सापडले आहे जे हवामानाचा अंदाज वर्तवण्याचे काम करते आणि ते सुध्दा जनसामान्यांना उपयोग होइल अशा प्रकारे. हे वेब अप्प्लिकेशन फक्त माहीती देउन थांबत नाही तर ती माहीती आपल्याला उपयोगी होइल याची काळजी देखील घेते. त्या वेब सर्वीसचे नाव आहे अंब्रेलाटुडे.कॉम (umbrellatoday.com ). नावात लिहिल्याप्रमाणेच ही वेब साइट एक छोटेसे काम करते. आज छत्री बरोबर न्यावी की नाही? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला हे वेब साइट देते.

इथे फक्त तुम्ही राहत असलेल्या शहराचे नाव टाइप केले की ही साइट तुम्हाला आज छत्रीची गरज आहे अथवा नाही हे सांगते. ही माहीती रोज एका ठरावीक वेळी स्वत:ला मेल अथवा मोबाइल एसएमएस द्वारे पाठवण्याची सोयदेखील इथे आहे.

म्हणुनच तर या साइटला जगातील सर्वात सोपे हवामानपत्र असे म्हंटले जाते.


The "NEWS" program on doordarshan (Hope you know this TV channel) was used to be the Top TRP program in good old days. And at the end of NEWS , they used to tell weather report, maximum and minimum temperatures of four metro cities of India.

My curious mind always used to wonder why they are telling us about temperatures and what I am going to do with advance information of wether it will rain today or not. (I was a child ! happy little child). My father explained me once that this info is important for farmers, fishermen and travellers. But still, I was not convinced. That info was really useless for me.

Do you know why I am telling all this to you? Because I recently found a web application which gives us simillar info in a useful way. This webapp doesn't stop only at information stage, it helps (and reminds too) users to actually use that.

I am talking about a site called
umbrellatoday.com
As name suggests, this site gives you a daily reminder for carrying your umbrella. It also predicts weather conditions and let you know if you need to carry an umbrella or not.

Why I like Umbrellatoday.com ?
  • In their own words, “It’s like totally the simplest weather report ever!"
  • Nice and Clean interface
  • Innovative idea
Simplest weather report ever - Umbrellatoday.com Simplest weather report ever - Umbrellatoday.com Reviewed by Salil Chaudhary on 07:51 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.