Blind painter from Turkey - Esref Armagan

[ MARATHI ].......

काल टीव्हीवर एका हिंदी चित्रपटाची जाहीरात पाहीली. चित्रपटाचे नाव आहे "Shadow" (शॅडो). या चित्रपटाची खासीयत म्हणजे चित्रपटाचा नायक अंध आहे. चित्रपटात नव्हे तर खरोखर अंध आहे. ती जाहीरात पाहुन अशाच एका प्रतीभावान अंध व्यक्तीची मला आठवण झाली. त्या व्यक्तीचे नाव आहे एस्रेफ अर्मागन (Esref Armagan). एस्रेफ अर्मागन हे जन्मापासुन अंध असलेले एक चित्रकार आहेत. होय चित्रकार. एक असा चित्रकार जो काहीच पाहु शकत नाही आणि तरीही चित्रे काढतो आणि रंगवतो देखील. एस्रेफ यांच्याबद्दल डीस्कवरी वाहीनीवर एक कार्यक्रम मी पाहीला होता. त्यांच्याबद्दल इंटरनेटवर शोध घेतला आणि अधीक माहीती मिळवली. नेटभेटच्या वाचकांशी या असामान्य अद्भुत व्यक्तीमत्वाची ओळख करुन देत आहे.

एस्रेफ अर्मागन हे मुळचे टर्की या देशाचे नागरीक आहेत. जन्मापासुनच दोनही डोळ्यांनी अंध असलेल्या अर्मागन यांना बालपणी कसलेही प्रशीक्षण मिळाले नाही. मात्र त्यांनी स्वतः प्रयत्न करुन लिहिण्याची आणि चित्रे काढण्याची कला अवगत केली. अर्मागन हे ब्रशचा वापर न करता बोटांनी चित्रे रंगवतात. यासाठी ते ऑइल पेंटचा वापर करतात. गेली ३५ वर्षे ते हा कलाविष्कार साकारताहेत.

ब्रेल स्टायलसचा वापर करुन ते आधी चित्र काढतात आणि मग रंगांमध्ये बोटे बुडवुन त्या चित्रात रंग भरतात. पोट्रेट्स किंवा निसर्गचित्र काढण्याची एक वेगळी पद्धत त्यांनी विकसीत केली आहे. एखाद्या डोळस चित्रकाराकडुन ते आधी चित्र काढुन घेतात आणि ते चित्र उलट करुन त्यावर उमटलेल्या रेषांवर डावा हात फिरवुन चित्राची संकल्पना मनात साठवतात. आणि मग स्वतः तसेच चित्र काढुन रंगवतात.

एस्रेफ अर्गामन यांच्याबद्दल अधीक माहीती मिळवण्यासाठी तसेच त्यांची चित्रे पाहण्यासाठी http://www.armagan.com/ या त्यांच्या वेबसाईटला भेट द्या.

All images are from armagan.comEsref Armagan was born both unsighted and to an impoverished family. As a child and young adult he never received any formal schooling or training; however, he has taught himself to write and print. He draws and paints by using his hands and primarily oil paints.

He has also developed his own methods of doing portraits. He asks a sighted person to draw around a photograph, then he turns the paper over and feeling it with his left hand, he transfer what he feels onto another sheet of paper, later adding color.

To know more about him or to see his paintings, please visit - http://www.armagan.com/Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Blind painter from Turkey - Esref Armagan Blind painter from Turkey - Esref Armagan Reviewed by Salil Chaudhary on 07:53 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.