Creativity at it's best ! - Awesome stuff by Oscar Diaz

[ MARATHI ].......

नेटभेटमध्ये मी प्रामुख्याने संगणक, उद्योजगता , व्यक्तीमत्व विकास आणि सृजनशीलता या विषयांवर आधारीत लेख लिहत असतो. यापैकी सृजनशीलता म्हणजेच क्रीएटीव्हीटी (Creativity) वर मात्र फारसे लिहिले नव्हते. म्हणुन आज ठरवले होते की काही झाले तरी क्रीएटीव्हीटीबद्दलच काहीतरी लिहायचे. (खरेतर संगणक, ईंटरनेट या गोष्टींवर खुप लिहायचे असते. या गोष्टींचा रोजच्या जीवनात अधीक फायदा होतो म्हणुनच कदाचीत माझा त्याबाबतीत लिहिण्यावर जास्त भर असतो). त्यासाठी मुद्दामहुन इंटरनेटवर शोध घेतला, तेव्हा मला सपडली ऑस्कर डायाझ (Oskar Daiz) या एका स्पॅनीश डीझायनरची वेबसाईट.

रोजच्या जीवनात उपयोगी ठरणार्‍या गोष्टी आपण जशा सामोर्‍या येतात तशाच स्वीकारतो मात्र यांमध्ये बदल करण्याची, या गोष्टींमध्ये अतीशय कल्पकतेने सुधारणा करण्याची कला म्हणजेच डीझायनींग. ऑस्कर डायाझने बनवलेल्या गोष्टी पाहील्यावर पहील्यांदा विचार आला, "अरे, हे मला आधी का नाही सुचले !".
अतीशय सोप्या आणि विनाखर्चीक पद्धतीने ऑस्कर डायझने डीझाइन केलेल्या अनेक गोष्टींपैकी मला आवडलेल्या काही कल्पक डीझाइन्स मी येथे देत आहे. ऑस्करच्या आणखीही डीझाइन्स आहेत. त्या पाहण्यासाठी तुम्ही http://www.oscar-diaz.net/ येथे भेट देउ शकता.

१. शाईचे कॅलेंडर (Ink Calender) -
कागदावर शाईचा थेंब पडल्यावर शाई त्या कागदावर आपोआप पसरत जाते या सोप्या आणि साध्या गोष्टीवर आधारीत हे कॅलेंडर आहे. यालाच विज्ञानाच्या भाषेत कॅपीलरी अ‍ॅक्शन असेही म्हणतात. खालील चित्र पाहुन तुमच्या लक्षात आले असेलच की शाईच्या दौतीमधुन थोडी थोडी शाई दररोज कॅलेंडरवर पसरत जाते आणि दररोज एक एक दिवस शाईने भरत जातो. दर महीन्याला एक दौत वापरुन हे शाईचे कॅलेंडर तारीख दाखवते. मुख्य म्हणजे दर महीन्याला साजेसे असे विविध शाईचे रंग यामध्ये वापरलेले आहेत. उदाहरणार्थ - डीसेंबर महीन्यात गडद निळा, शिशीर ऋतुमध्ये नारींगी आणि उन्हाळ्यात लाल असे विविध रंग वापरता येतात. एका बेसीक वैज्ञानीक तत्त्वावर चालणार्‍या या कॅलेंडरची खुबी म्हणजे केवळ तारीख न दाखवता हे कॅलेंडर कीती दीवस आणि वेळ जात आहे ते देखील दाखवते. माझ्या मते हातातुन नीसटुन जाणार्‍या वेळेची जाणीव करुन देणारे हे एकमेव कॅलेंडर असावे.

२. नोव्हीस टेबल - (Novis Table) -
नोव्हीस नावाचे हे टेबल पोर्टेबल आहे म्हणजेच हे टेबल कोठेही कधीही सोबत नेता येते, पाहीजे तेव्हा मोडुन पॅक करता येते आणि पाहीजे तेव्हा जोडुन वापरता येते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याची जोडणी करताना कोण्त्याही हत्यार्/अवजारांची गरज भासत नाही. या टेबलची जोडणी कशी करावी हे खालील चित्रांमधुन स्पष्ट होइल.
३. विचारांचा आरसा -
नेहमी व्यंगचीत्रांमध्ये एखादी व्यक्ती विचार करताना दाखवायची असेल तर डोक्यावरती कॉलाआउट्स दाखवीले जातात. (चित्र पाहुन लक्षात येइल). कॉलआउटचा अर्थ व्यक्ती विचार करते आहे असाच होतो. अगदी त्याच प्रकारचा आरसा ऑस्कर डायाझने बनवीला आहे. या आरशात पाहताना आपल्या मनात काहीतरी विचार चालु आहेत असाच भास होतो.
एकदम गमतीशीर आहे हा प्रकार!


४. पेन स्टँड -
पेनांनी भरलेल्या पेन स्टँडमध्ये जर टाचण्या, खोडरबर इत्यादी छोट्या गोष्टी शोधायच्या असतील तर पुर्ण पेनस्टँडच रीकामा करावा लागतो. या नेहमीच्या अडचणीवर ऑस्कर डायाझने उपाय शोधला आहे. त्याने डीझाइन केलाय एक पेनस्टँड. याबाबत अधीक सांगण्याची गरज नाही, खालील चित्र पाहुन तुम्हाला याचा उलगडा होइलच.वर उल्लेखीलेल्या सर्व डीझाइन्स साध्या आणि सोप्या आहेत. क्रीएटीव्हीटीसाठी आणि कल्पकतेसाठी खुप शिक्षण किंवा अमाप पैसा असला पाहीजे नाही. आसपासच्या साध्यासोप्या गोष्टींकडे जरा जागरुकतेने आणि चौकसबुद्धीने पाहीले तर अशा अनेक भन्नाट कल्पना आपल्यालाही सुचतील. गरज आहे ती फक्त डोळसपणे पाहण्याची आणि थोड्याश्या कल्पकतेची !
(Source - http://www.oscar-diaz.net/)

Creativity at it's best ! - Awesome stuff by Oscar Diaz Creativity at it's best ! - Awesome stuff by Oscar Diaz Reviewed by Salil Chaudhary on 07:01 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.