Free online file converter - Zamzar.com

[ ENGLISH/ MARATHI ].......

संगणकावर काम करताना नेहमी जाणवणारा एक त्रास म्हणजे विविध फाइल फॉर्मॅट्स . एखादे गाणे आवडीने डाउनलोड करुन ऐकायला जातो तेव्हा कळते की डाउनलोड केलेले गाणे MP4 फॉर्मॅट मधे आहे आणि आपल्याकडे आहे MP3 प्लेयर. मग एकतर MP4 प्लेयर शोधा किंवा MP3 कन्व्हर्टर. इम्टरनेटवर शोधाशोध सुरु.

मीडीया फाइल्स असो, टेक्स्ट फाइल्स असो किंवा कंप्रेसड फोल्डर फाइल्स असो दररोज कित्येक प्रकाराच्या फाइल्सशी आपला सामना होतच असतो. अशा वेळेस होणार्‍या त्रासापासुन आणि मुख्य म्हणजे मनस्तापापासुन बचाव करण्यासाठी एक वेब अप्लिकेशन आपल्या सर्वांच्याच मदतीला धावुन आले आहे. त्या वेब अप्लिकेशनचे नाव आहे झमझार्.कॉम. (http://www.zamzar.com/). २००८ सालचे सर्वोत्तम वेब अप्लिकेशन असा पुरस्कार मिळालेले झमझार एकदम 'दमदार' वेब अप्लिकेशन आहे.

वापरण्यास अतीशय सोपे असलेले आणि फाइल्सचे रुपांतर अतीशय सोप्या रीतीने करण्यास मदत करणारा इंटरफेस (चेहरामोहरा) असलेल्या या वेब अप्लिकेशनवरुन अगदी मोजक्या माउस क्लिक्सच्या सहाय्याने फाइलचे दुसर्‍या फाइल टाइप मध्ये रुपांतर करता येते.

झमझार्.कॉम च्या सहाय्याने काय काय करता येते?

  • झमझारच्या सहाय्याने बर्‍याच विविध फाइल्सचे रुपांतर करता येते. (उदाहरणार्थ - डॉक्युमेंट document, इमेज image, व्हीडीओ video, अर्काइव्ह archive, ऑडीओ audio, आणि कॅड CAD फॉर्मॅट्स)

  • १०० एमबी इतक्या आकारापर्यंतच्या फाइल्सचे मोफत रुपांतरण करता येते.

  • झमझारच्या मदतीने टेक्स्ट (Text) स्वरुपातील फाइल्स MP3 प्रकारात रुपांतरण करता येते. म्हणजे एखादी फाइल वाचायचा कंटाळा आला असेल तर खुशाल त्याची MP3 फाइल बनवुन ऐकता येइल.

  • मोजुन ४ क्लिक्सच्या सहाय्याने फाइल कन्व्हर्ट करता येते.

  • तुम्हाला हवी असलेली फाइल संगणकामधुन अपलोड करा , कोणत्या प्रकारामध्ये फाइल रुपांतरीत करायची आहे ते निवडा आणि तुमचा इमेल पत्ता द्या. काही मिनिटातच फाइल कन्व्हर्ट होइल आणि कन्व्हर्ट केलेल्या फाइलला डाउनलोड करण्यासाठीची लिंक तुमच्या इमेल पत्त्यावर पाठवण्यात येइल. बस इतके सोपे आहे ते.

  • एवढेच नव्हे तर झमझारच्या सहाय्याने ऑनलाइन व्हीडीओ फाइल्स देखील डाउनलोड करता येतात. उदाहरणार्थ युट्युब वरील (Youtube) ऑनलाइन व्हीडीओ देखील पाहीजे त्या फाइल प्रकारात बदलुन इमेल करता येतात.

  • एकापेक्षा अधीक फाइल्स एकत्र रुपांतरीत करता येतात.

मला खात्री आहे की झमझार तुम्हाला नक्की आवडेल. संगणकावर सहजगत्या काम करण्याच्या प्रवासात नेटभेटची ही शिदोरी तुम्हास उपयोगी पडेलच !

One of the regular problem that we face while working on computers is to play around with different file formats. Many times we download a song only to realise that it is in MP4 format, which our regular MP3 player can not play. Then the search for either MP3 converters or MP4 players starts.

Be it media files, text files or compressed folder files, we have to tackle lot of file formats. Here is an application that saves you from all this hassels of file conversions, ZAMZAR.COM.

Zamzar is incredibly easy to use, with a clean interface which simplifies the whole conversion process. Browse to the file in your computer, select the format you want to convert the file to and give your email id. That's all. Link for your coverted file will be sent to your email id within next few minutes.

Zamzar can also convert web video directly from sites such as YouTube.

Try this once and I am sure that you will THANK me forever for this awesome web app.


Free online file converter - Zamzar.com Free online file converter - Zamzar.com Reviewed by Salil Chaudhary on 10:29 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.