Google Docs - Create files in the sky !

[ MARATHI ].......

मला नेहमी वाटायचे की गुगल किंवा अ‍ॅपल किंवा आणखी कुणी कीतीही प्रगती करोत, मायक्रोसॉफ्टला मागे टाकु शकत नाहीत. मला असे वाटण्याचे कारण म्हणजे मायक्रोसॉफ्टचा हुकुमाचा एक्का "मायक्रोसॉफ्ट ऑफीस". कंप्युटर शिकायला सुरुवात होते तीच मुळी मायकोसॉफ्ट ऑफीसच्या वर्ड , एक्सेल आणि पॉवरपॉइंट या सॉफ्टवेअर्सपासुन. मायक्रोसॉफ्ट ऑफीस आता अंगात असे भिनलय की दुसरे कोणते ऑफीस अप्लिकेशन वापरावेसे वाटतच नाही. (बरेच मोफत ऑफीस अप्लिकेशन्स मिळतात बाजारात मात्र आपण पैसे देउन मायक्रोसॉफ्टच विकत घेतो!).

परंतु आता मात्र मला असे वाटत नाही. मायक्रोसॉफ्टच्या या हुकुमाच्या एक्क्याला मात देण्यासाठी गुगलकाकांनी गुगल डॉक्स (Google docs) बाजारात आणलं आहे. तसे गुगल डॉक्सचा जन्म होउन तीन वर्षे झाली आहेत पण बाळाने नुकताच रांगायला सुरुवात केली आहे.

गुगल डॉक्सच्या सहाय्याने वर्ड डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स (मायक्रोसॉफ्ट एक्सेल सारखा प्रकार) आणि प्रेझेंटेशन्स बनवता येतात. मायक्रोसॉफ्ट ऑफीस वापरता येतं अशा प्रत्येकाला गुगल डॉक्स सहजपणे वापरता येते. आपल्या ओळखीचे bold, underline आणि italics सारखी टुलबारवरील बटणे गुगल डॉक्सनेही वापरली आहेत. त्यामुळे आपण काही नवे सॉफ्टवेअर वापरत आहोत हे कळत देखील नाही.

मायक्रोसॉफ्ट एक्सेल प्रमाणेच गुगलच्या स्प्रेडशीट मध्ये फॉर्म्युलेज, फंक्शन्स , चार्टस, कमेंट्स , टेबल्स अगदी सहजगत्या वापरता येतात. एवढेच नव्हे गुगल डॉक्स मध्ये सेव्ह केलेल्या फाइल्स वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये सेव्ह करुन ठेवता येतात.


गुगल डॉक्स वापरण्याचे फायदे -


१. गुगलच्या इतर प्रॉडक्ट्स प्रमाणे गुगल डॉक्स पुर्णपणे मोफत आहे.

२. गुगल डॉक्स वापरण्यासाठी कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची गरज नाही. गुगल डॉक्स ऑनलाइन वापरता येते. हव्यात त्या फक्त तीनंच गोष्टी - कंप्युटर, ईंटरनेट आणि गुगल अकाउंट आयडी.

३. गुगल डॉक्स मध्ये बनवीलेल्या फाइल्स ऑनलाईनच सेव्ह करता येतात. म्हणजे अतीरीक्त हार्ड डीस्क स्पेसची आवश्यकता नाही.

४. गुगल डॉक्स हे कोलॅबरेटीव्ह अप्लिकेशन आहे. म्हणजेच एका वेळेला एका पेक्षा जास्त व्यक्ती एकाच डॉक्युमेंटवर काम करु शकतात.

५. गुगल डॉक्स मुळे भरपुर वेळ वाचतो. नेहमीप्रमाणे एखादी फाइल बनवुन आपण इतरांना इमेल करतो आणि त्यावर त्यांच्या प्रतीसादांची वाट पाहतो. सगळ्यांकडे मग त्या फाइलची एक कॉपी बनते आणि प्रत्येकाने त्यामध्ये केलेले बदल हे इतरांना इमेल करेपर्यंत त्याच फाइलच्या अनेक कॉपीज सर्वत्र फीरत राहतात. या वेळखाउ पध्दतीपासुन गुगल डॉक्स आपली मुक्ती करते. एकच फाइल बनवुन ती ऑनलाइन ठेवुन सर्वांना त्यामध्ये बदल करण्यासाठी आमंत्रीत करता येते. अशाप्रकारे प्रत्येक जण एकाच फाइलवर काम करतो आणि इतरांनी केलेल बदल कोणासही इमेल न करता कळवता येतात.

६. कोणत्याही प्रकारचा बॅकअप घेण्याची आवश्यकता नसते. संगणकामध्ये काही बिघाड झाल्यास आपले सर्व डॉक्युमेंट्स कायमचे डीलीट होण्याचा धोका असतो मात्र गुगलच्या सर्वरवर डॉक्युमेंट्स असणे म्हणजे जगातील सर्वात सुरक्षीत ठीकाणी असणे असेच आहे.

७. गुगल डॉक्स ऑनलाईन उपलब्ध असल्याने जगात कोठेही असलात तरी तुमचे सर्व डोक्युमेंट्स पाहता/ वापरता येतात. म्हणजे थोडक्यात तुमचा संगणकच तुमच्या बरोबर असतो.

८. गुगल डॉक्स ही सर्व बीझनेस मोबाइल्स आणि स्मार्टफोन्सवर पुर्णतया म्हणजे सर्व फंक्शन्ससहीत काम करणारी एकमेव ऑनलाईन डॉक्युमेंट सर्वीस आहे.

मी नेटभेटच्या सर्व वाचकांना सल्ला देइन की गुगल डॉक्स जरुर वापरा. किमान महत्त्वाच्या फाइल्स सेव्ह करण्यासाठी तरी नक्की वापरा. आणि निर्धास्त होउन कंप्युटींगचा आनंद घ्या.

गुगल डॉक्स वापरण्यासाठी येथे क्लिक करा.

(मी येथे दीलेली माहीती ही गुगल डॉक्सची फक्त तोंडओळख आहे. पुढे वेळ मिळेल त्याप्रमाणे सखोल माहीती जरुर लिहेन. मात्र या दरम्यान काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर कमेंट्स मध्ये किंवा नेटभेटच्या प्रश्नमंचामध्ये जरुर मांडावेत. मी सर्वतोपरी तुमचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करेन)

Google Docs - Create files in the sky ! Google Docs - Create files in the sky ! Reviewed by Salil Chaudhary on 08:39 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.