How to calculate EMI in excel ?

[ MARATHI ].......अखेर गगनाला भिडलेले घर/प्रॉपर्टीचे दर खाली उतरे लागले आहेत. तज्ञांच्या मते गृहखरेदीसाठी सध्या उचीत वेळ आहे. मला ठाउक आहे तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी घर शोधायला सुरुवात केली असेलच. नेटभेट तर्फे तुमच्यासाठी ही छोटीशी मदत.

आज मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या सहाय्याने गृहकर्जाचा मासिक हप्ता कसा काढावा (How to calculate EMI with excel? ) ते सांगणार आहे. अतीशय उपयोगी आणि सोपे आहे ते.

कर्जाचा मासिक हप्ता म्हणजेच EMI किती आहे ते काढण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये PMT नावाचे एक फंक्शन वापरले जाते.

How to calculate EMI in excel ?

  • मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये कोणत्याही एका सेल (रकाना) मध्ये =pmt( असे लिहा.
  • लगेचच PMT फंक्शनचा पुर्ण फॉर्म्युला दीसु लागेल. तो काहीसा असा दीसेल -
=pmt(rate,nper,pv,[fv],[type])
  • EMI मोजण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक या फॉर्म्युला मध्ये दीसतात. त्यांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे -
  1. rate = कर्जाचा मासिक व्याजदर -- व्याजाचा वार्षीकदर दीला असेल तर तो महीन्यांमध्ये बदल करण्यासाठी वार्षीक दरास १२ ने भागावे (Rate of interest per month)
  2. Nper = कर्जाची एकुण मुदत (महीने) - Number of periods (total tenure of loan. In our case it is number of months)
  3. Pv = कर्जाची एकुण रक्कम (मुद्दल) Total loan amount (Principal value)
  4. [fv] आणि [type] यांच्या किमती भरणे आवश्यक नाही त्यामुळे सध्या तरी त्याकडे दुर्लक्ष करा.
  • आता PMT फंक्शनमध्ये सर्व किंमती भरा. आणि Enter एंटर बटण दाबा. त्याच सेल मध्ये आता कर्जाचा मासिक हप्ता किती आहे ते दीसु लागेल.
(एक्सेलमध्ये कॅलक्युलेट केलेल्या या उत्तरापुढे कदाचीत ($) चिन्ह दीसेल, त्यामुळे गोंधळुन जाउ नका. मुद्दलाची रक्कम जर रुपयांमध्ये असेल तर हप्त्याची रक्कम देखील रुपयांमध्येच असेल.)

उदाहरण =
जर २ लाख रुपये कर्जाचा १२% वार्षीक व्याजदराने १० वर्षे मुदतीकरीता मासिक हप्ता काढायचा असेल तर खालीलप्रमाणे किंमती भरा -

= pmt(12%/12, 10*12, 200000)

इथे वार्षीक व्याजदरास १२ ने भागुन मासिक दरामध्ये बदलुन घेतले आहे. आणि १० वर्षे मुदतीस १२ ने गुणुन महीन्यांमध्ये बदलुन घेतले आहे.
आता तुम्ही कधीही कर्जाचा मासिक हप्ता किती असेल ते लगेच शोधुन काढु शकता. हा फॉर्म्युला फक्त गृहकर्जासाठीच नसुन इतर सर्व प्रकारच्या कर्जांसाठी देखील लागु पडतो.

मात्र प्रत्येक वेळेस संगणक जवळ असेलच असे नाही. अशा वेळेस खालील फॉर्म्युला तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करुन ठेवा, म्हणजे मग मोबाइलच्या सहाय्याने चुटकीसरशी हे कॅल्क्युलेशन करता येइल.

EMI = [(p*r) (1+r)^n ] / [ (1+r)^n – 1]

p = कर्जाची एकुण रक्कम (मुद्दल) = principal (amount of loan),
r = कर्जाचा मासिक व्याजदर = rate of interest per month (annual rate/12)
n = कर्जाची एकुण मुदत (महीने) = no. of instalments in the tenure.

How to calculate EMI in excel ? How to calculate EMI in excel ? Reviewed by Salil Chaudhary on 09:10 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.