It is easier to Criticize, but difficult to improve !

[ ENGLISH/ MARATHI ].......

फार पुर्वी एका महान चित्रकाराकडे दुसरा एक नवशिका चित्रकार चित्रकलेचे धडे घेत होता. चित्रकलेत बर्‍यापैकी पारंगत झाल्यावर या नविन चित्रकाराने आपल्या चित्रकलेच्या गुणांची स्वतःच पारख करण्याचे ठरवले. त्याने ब्रश आणि रंग घेउन एक निसर्गचित्र काढण्यास सुरुवात केली आणि तब्बल ३ दिवसांच्या अथक मेहनतीने एक अतीशय सुंदर निसर्गचित्र बनवीले.

Once upon a time there was a painter who had just completed his course under disciplehood of a great painter. This young artist decided to assess his skills of skills so he decided to give his best strokes on the canvass. He took 3 days and painted beautiful scenery. Suddenly an idea flashed in his mind and he decided to display it on a busy street-square of that small town he was resident of. He wanted people's opinion about his caliber and painting skills..
He put his creation at a busy street-crossing. And just down below a board which read–

"Gentlemen, I have painted this piece. Since I'm new to this profession I might have committed some mistakes in my strokes etc. Please put a cross wherever you see a mistake."

अचानक एक कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि त्याने ते चित्र त्याच्याच शहरातील एका वर्दळीच्या ठीकाणी लावले.त्याच्या कलागुणांबद्दलची लोकांची मते त्याला जाणुन घ्यायची होती. चित्राच्या शेजारीच त्याने एक फलक लावला ज्यावर लिहिले होते," लोकहो, मी हे चित्र काढले आहे, परंतु मी या क्षेत्रात नविन असल्या कारणाने यात काही चुका असण्याचा संभव आहे. कृपया, जिथे जिथे चुक आढळेल त्या ठीकाणी चित्रावर काठ मारा."

While he came back in the evening to collect his painting he was completely shattered to see that whole canvass was filled with Xs (crosses) and some people had even written their comments on the painting.

Disheartened and broken completely he ran to his masters place and burst into tears. Sobbing and crying inconsolably he told his master about what happened and showed the pathetic state of his creation which was filled with marks everywhere. Such was the state that colors were not visible, only things one could see were crosses and correction remarks. This young artist was breathing heavily and master heard him saying "I'm useless and if this is what I have learnt to paint I'm not worth becoming a painter. People have rejected me completely.. I feel like dying"

सायंकाळी जेव्हा उत्साहाने चित्रकार त्या चौकात परतला तेव्हा ते चित्र पाहुन अतीशय हैराण झाला. त्याचे पुर्ण चित्र लोकांनी वेगवेगळ्या ठीकाणी काठ मारुन भरुन टाकले होते. काही जणांनी तर त्या चित्रावरच विविध सुचना लिहिल्या होत्त्या.

या प्रकारामुळे चित्रकार खुप निराश झाला. तो धावत त्याच्या गुरुकडे गेला आणि ओक्साबोक्शी रडू लागला. रडतच त्याने ते चित्र गुरुंना दाखवीले आणि काय घडले त्याची सर्व कथा सांगीतले.तो म्हणाला की," मला असे वाटतेय की मी जे काही शिकलोय त्याचा काहीच फायदा नाहीये. लोकांनी मला पुर्णपणे नाकारलंय. मी कधीच चित्रकार बनु शकणार नाही. मला तर आता जीव द्यावासा वाटतोय."

Master smiled and suggested "My Son, I will prove that you are a great artist and have learnt a flawless painting."

Young disciple couldn't believe it and said "I have lost faith in me and I don't think I am good enough.. don't make false hopes.."
"Do as I say without questioning it.. It WILL work." Master interrupted him.

यावर त्याच्या गुरुने त्याला समजावले व म्हणाले. " तु एक महान चित्रकार आहेस. आणि हे मी सिध्द करुन दाखवु शकतो"
शिष्याचा यावर विश्वासच नाही बसला. तो म्हणाला," नाही उरुजी, मी स्वःतःवरचा विश्वासच हरवुन बसलो आहे. मला असे वाटत नाही की मी एक चांगला चित्रकार आहे. तुम्ही मला खोटा दीलासा देउ नका."
"एक प्रश्नही न विचारता मी जसे सांगतो तसे कर" गुरुजी त्याचे बोलणे मध्येच थांबवत म्हणाले.

"Just paint exactly similar painting once again for me and give it to me. Will you do that for your master?.." Master instructed.

Young artist reluctantly agreed and two days later early morning he presented a replica of his earlier painting to his master. Master took that gracefully and smiled.

"Come with me." master said.

They reached the same street-square early morning and displayed the same painting exactly at the same place. Now master took out another board which read – "Gentlemen, I have painted this piece. Since I'm new to this profession I might have committed some mistakes in my strokes etc. I have put a box with colors and brushes just below. Please do a favor. If you see a mistake, kindly pick up the brush and correct it."

Master and disciple walked back home.


" अगदी असंच चित्र माझ्यासाठी पुन्हा काढ आणि मला आणुन दे" गुरुजी बोलले. हो-नाही म्हणत तो तरुण चित्रकार पुन्हा एकदा तसेच चित्र काढण्यासाठी तयार झाला. दोन दिवसांनंतर त्याने हुबेहुब तसेच चित्र काढुन आपल्या गुरुला दीले. गुरुजीं ते चित्र पाहुन खुष झाले आणि म्हणाले, "चल माझ्याबरोबर" .

ते दोघेही पुन्हा त्याच चौकात गेले. गुरुजींनी ते चित्र पुन्हा त्याच ठीकाणी लावले आणि सोबतच एका फलकावर लिहिले, " लोकहो , मी हे चित्र काढले आहे, परंतु मी या क्षेत्रात नविन असल्या कारणाने यात काही चुका असण्याचा संभव आहे. जर तुम्हाला चुक आढळली तर कृपया या ठीकाणी शेजारीच ठेवलेल्या रंगपेटी आणि कुंचल्याच्या सहाय्याने ती सुधारा. मी आपला आभारी राहीन"

त्यानंतर ते गुरु शिष्य घरी गेले.

They both visited the place same evening. Young painter was surprised to see that actually there was not a single correction done so far. But master wasn't satisfied as yet and he told his disciple "May be one day was too little a time for people to come up with ideas and take out time out of their busy schedules to correct it so let us keep it here for one more day. Tomorrow is Sunday, so we can expect some corrections coming in."

Next day again they visited and found painting remained untouched..

They say the painting was kept there for a month for no correction came in!

त्याच दीवशी सायंकाळी दोघेही तेथे परत गेले. आपल्या चित्रामध्ये कोणीच काही बदल केलेला नाही हे पाहुन शिष्य थोडा आश्चर्यचकीत झाला. परंतु गुरुजींचे अजुन समाधान झाले नव्हते. ते शिष्याला म्हणाले, " कदाचीत पहीलाच दीवस असल्याने अजुन कोणीही येथे आलेले नसेल. आपण उद्या पुन्हा येउया."

दुसर्‍या दीवशीही तसेच घडले. त्या चित्रावर कोणीही काहीही सुधारणा केली नव्हती. एक महीनाभर ते चित्र तेथे ठेवण्यात आले होते. परंतु कोणीच काहीच सुधारणा सुचवीली नाही.



Moral of the Story: It is easier to criticize, but difficult to improve.

तात्पर्य - दुसर्‍याला दोष देणे अतीशय सोपे असते मात्र फक्त दोष देण्यापेक्षा तो दोष सुधारणे तेवढेच कठीण असते.

It is easier to Criticize, but difficult to improve ! It is easier to Criticize, but difficult to improve ! Reviewed by Salil Chaudhary on 11:44 Rating: 5

No comments:




http://learn.netbhet.com





Powered by Blogger.