Make ringtones from MP3 songs online, for free !

[ ENGLISH/ MARATHI ].......
मित्रानो आता नेहमीच्या जुन्या आणि कंटाळवाण्या रींगटोन्स विसरुन जा आणि तुमच्या आवडत्या गाणांच्याच रींगटोन्स बनवुन सर्वांना ऐकवा. आज मी तुम्हाला झेड्-एड्ज्.कॉम (Zedge.com) बद्दल सांगणार आहे. (झेड्-एड्ज जरा कठीण नाव वाटते म्हणुन मी या साईटला झेडगे.कॉम म्हणतो. तेवढेच जरा मराठीपण वाटते नावात !)

हल्ली विविध गाण्यांचे रींगटोन्स ठेवण्यास सर्वांना आवडते. तशी MP3 गाणी जशीच्या तशी रींगटोन म्हणुन ठेवता येतातच. पण यातला मुख्य प्रॉब्लेम म्हणजे, मोबाइल वाजल्यावर गाण्यांचे मुख्य शब्द ऐकु यायच्या आधी बराच वेळ बॅकग्राउंड म्युझीकच ऐकु येते. झेडगे.कॉम च्या सहाय्याने आपण गाण्यातला आवडता भागच रींगटोन म्हणुन निवडु शकतो. चला तर मग पाहुया, झेडगे.कॉम च्या सहाय्याने मोफत रींगटोन कशी बनवायची ते.

How to create ringtone from mp3 songs?
१. zedge.com वर तुमचे मोफत अकाउंट उघडा आणि लॉग्-इन करा.


२. "Ringtone maker " वर क्लिक करा.

३. आता गाणे अपलोड करण्यास सांगण्यात येइल. तुम्हाला ज्या गाण्याची रींगटोन बनवायची आहे, ते गाणे संगणकामध्ये जेथे आहे तीथे जाउन (browse)सीलेक्ट करा.

४. जवळपास सर्वच फॉर्मॅट्स (MP3, wav etc.) येथे स्वीकारले जातात.

५. एकदा पुर्ण गाणे अपलोड झाले की रींगटोन बनवण्यासाठीचे टुल (MP3 cutter) स्क्रीनवर दीसु लागेल.


६. या टुल वरील "MOVE" या बटणाच्या सहाय्याने गाण्यातील तुमचा आवडता भाग सीलेक्ट करा. (स्पीकर्स चालु ठेवण्यास विसरु नका)

७. तुमचा गाण्यातील आवडता भाग निवडुन झाल्यानंतर त्याची रींगटोन बनवण्यासाठी "DONE" या बटणावर क्लिक करा.

८. आता तुमची आवडती रींगटोन तयार झालेली असेल. तेथेच "PC Download" चा पर्याय दीसेल त्यावर क्लिक करुन ही नविन रींगटोन तुमच्या संगणकामध्ये सेव्ह करुन घ्या.
आता ही रींगटोन आपल्या मोबाइलवर अपलोड करुन इतरांना ऐकवा.

कोणत्या गाण्याची रींगटोन बनवायला तुम्हाला आवडेल ते मला कंमेंट्स मध्ये लिहुन कळवा. मी त्यानुसार रींगटोन बनवुन इमेल करेन. अगदी चकटफु (Free)!

------------------------------------------------------------------------------------------------

Make ringtones from MP3 songs for free ! Friends, Now you need not bore others with standanrd monotonous ringtones. These days almost all mobile handsets support mp3 and other songs format which you can use for ringtones. Today I am going to tell you about customising a ringtone for your cellphone. We can simply apply a song as a ringtone. But many times we hear initial background music instead of words in song, when phone rangs. Our today's article will solve this problem forever for free. In my last article of zedge.com, we had talked about ringtone maker. This is your solution and here is a step by step guide for converting your favourite part of song in a ringtone.


1. visit zedge.com and log in to your account. (If you don't have account on zedge.com , create one. It's absolutly free)

2. Click on "Ringtone maker "

3. Now you will be asked to upload song, from which you want to create a ringtone. Browse to the location of song and upload it.

4. It supports almost all standard audio formats.

5. Once the entire song is uploaded, a tool (MP3 cutter) will appear on screen.

6. By clicking on "MOVE" button you can select your favourite patch/part of the song. (Don't forget to switch speakers ON)

7. Once your favourite part is selected, click on "DONE"

8. Now an option for "PC Download" will be available. Click on it and save your ringtone on your PC. Now you can upload the same on mobile phone and enjoy the music !
Make ringtones from MP3 songs online, for free ! Make ringtones from MP3 songs online, for free ! Reviewed by Salil Chaudhary on 04:42 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.