Most inspirational Video ever!

[ MARATHI ].......

आज रविवारी मी हा लेख लिहितोय. उद्या सोमवार आहे आणि एका दीवसाच्या सुट्टीनंतर उद्या ऑफीसला जाण्याचा खुपच कंटाळा आला आहे. उद्या पुन्हा रडत्-खडत उठायचं आणि पाय ओढत ऑफीसला जायचं . नेहमीचंच झालय हे.

खरचं आपण कितीतरी कामे अशी पाय ओढत आणि रडत्-खडतच करत असतो. पण याउलट जर आपण रोज नव्या जोशाने आणि प्ररणेने आपली कामे करु लागलो तर? आपल्या आवडीचे काम मिळाले नसेल कदाचित पण मिळालेले काम आवडीने करत गेलो तर यश मिळणार हे नक्की!

परंतु मनाजोगतं काहीच घडत नसताना आणि सगळीकडुन संकटांचा मारा होत असताना नवा जोश आणि प्रेरणा आणायची कोठुन? माझ्या मते, यशस्वी आणि महान समजल्या गेलेल्या जाणार्‍या सर्व व्यक्तींमध्ये एक गुण समान होता तो म्हणजे त्यांची स्वयंप्रेरणेने (Self motivation) काम करण्याची इच्छाशक्ती. अर्थात हा गुण प्रत्येकात असतोच असे नाही.मग आपल्यासारख्या पामरांनी काय करावे बरे? मित्रहो, मी आज तुम्हाला याबाबतचा माझा एक उपाय सांगणार आहे.

दोन वर्षांपुर्वी मी एका सेल्स ट्रेनींगमध्ये एक स्फुर्तीदायी व्हीडीओ (Motivational Video) पाहीला होता. मी आतापर्यंत पाहीलेल्या सर्वोत्तम व्हीडीओ क्लिप्स पैकी एक असा हा व्हीडीओ खरचं खुप प्रेरणात्मक आणि स्फुर्तीदायी आहे. जेव्हा जेव्हा मी निराशेने ग्रासलेला असतो तेव्हा हा व्हीडीओ आवर्जुन पाहतो. माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलेला हा व्हीडीओ तुम्हासही नक्कीच भावेल ही अपेक्षा.

वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी कॅन्सरचे निदान झालेला आणि तरीसुद्धा जिद्दीने त्यावर मात करत, टुर्-दे-फ्रान्स (Tour-de-france) या जगातील सर्वात कठीण सायकल शर्यतीत सलग सात वेळा जागतीक विजेतेपद पटकावणारा सायकलपटु लान्स आर्मस्ट्राँग (Lance Armstrong) , ऑलींपीक मधील""परफेक्ट टेन" (पुर्ण १० गुण) चा मान जगात सर्वप्रथम मिळवणारी रोमानीयाची नादीया कॉमानेकी (Nadia Comaneci), लहानपणी धावण्यात सर्वात कमजोर असलेला पण अथक परीश्रमाने ऑलींपीकमध्ये तब्बल १० पदकांची कमाई करणारा धावपटु कार्ल लुईस (Carl Lewis), भारतासाठी विश्वचषक जिंकणारा आणि ३५ जागतीक विक्रम नावावर असणारा क्रीकेटपटु कपील देव, जगातील सर्वात धोकादायक समजल्या जाणार्‍या फॉर्म्युला वन या शर्यतीत सलग सात वेला विजेतेपद पटकावणारा मायकेल शुमाकर (Michael Schumacher) आणि १२८५ गोल्स करणारा, फुटबॉलचा अनभीषीक्त सम्राट पेले (Pele) यांच्यावर चित्रीत करणात आलेला हा व्हीडीओ मी नेहमी आवर्जुन पाहतो.
नेटभेटच्या वाचकांसाठी हा खास व्हीडीओ मी येथे देत आहे. सुमारे पाच मिनिंटांच्या या व्हीडीओचे पार्श्वसंगीतही तीतकेच परीणामकारक आहे.म्हणुनच हा व्हीडीओ पाहताना स्पीकर्स चालु ठेवण्यास विसरु नका.

प्रत्येकाच्या संग्रही असावाच असा हा व्हीडीओ डाउनलोड करायचा असेल तर खाली कमेंटस मध्ये तुमचा इमेल पत्ता (Email Address) द्या. डाउनलोड लिंक मी तुम्हाला इमेलद्वारे पाठवेन.

असाच स्फुर्तीदायी आणखी एक व्हीडीओबद्दल मी सांगणार आहे. पण पुढच्या रवीवारी, पुन्हा ऑफीसला जायचा कंटाळा येइल तेव्हा :-)

तोपर्यंत हा व्हीडीओ जरुर पहा आणि कसा वाटला ते कळवायला विसरु नका.

Most inspirational Video ever! Most inspirational Video ever! Reviewed by Salil Chaudhary on 12:30 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.