"Paste Special" feature in MS Excel.

[ ENGLISH/ MARATHI ].......

मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये कॉपी आणि पेस्ट हे फंक्शन्स आपण बर्‍याचदा वापरतो. पण बहुतेक वेळा एखादा सेल कॉपी-पेस्ट करताना काही अडचणी येतात. उदाहरणार्थ - जर एखादया सेल मध्ये फॉर्म्युला असेल तर तो कॉपी-पेस्ट केल्यानंतर वेगळीच किंमत (Value) दाखवतो किंवा एखादा सेल कॉपी-पेस्ट होताना फॉर्मॅटींग सहीत (म्हणजे रंग, आकार, बॉर्डर्स ) कॉपी होतो. सेल, रो किंवा कॉलम कॉपी करताना कधी फक्त फॉर्म्युला कॉपी करायचा असतो, कधी फक्त किंमत किंवा कधी फक्त फॉर्मॅटींग, अशा वेळेस नेहेमीचे कॉपी पेस्ट फारसे उपयोगी पडत नाही. त्यासाठीच मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये पेस्ट स्पेशल (Paste Special) ची सुविधा दीलेली आहे.


कॉपी करावयासाठीचा डाटा आधी सीलेक्ट आणि कॉपी (Ctrl + C) करुन घ्या. त्यानंतर माउसवर उजवे बटण (Right click) वापरुन पेस्ट स्पेशल (Paste Special) सीलेक्ट करा. पेस्ट स्पेशल मध्ये विविध पर्याय दीसतात त्यांचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे -

All
Original cell is copied and pasted into the copied cell.
कॉपी केलेले मुळ सेल तंतोतंत तसेच पेस्ट करण्यासाठी ALL या पर्यायाचा वापर करा.


Formulas
Only Formula of the original cell is pasted.

मुळ कॉपी केलेल्या सेल मधील फक्त फॉर्म्युला कॉपी करण्यासाठी या पर्यायाचा वापर करा.

Values
Only the value of the original cell is pasted. If the original cell has a formula, the copied cell will contain the value (output of the formula) and not the formula itself.

कॉपी केलेल्या सेल मध्ये जर फॉर्म्युला असेल तर तो वगळुन फक्त त्या सेल मधील किंमत (Value) कॉपी करण्यासाठी Values या पर्यायाचा वापर करा.


Formats
Only the format of the original cell is pasted. Original cell's font, bold, font type and color background will be pasted onto the copied cell.

कॉपी केलेल्या सेल मधील किंमत (Value) वगळुन फक्त फॉर्म्युला कॉपी करण्यासाठी Formats या पर्यायाचा वापर करा.

Comments
Only a cell comment will be pasted.

एखाद्या सेल मध्ये लिहिलेल्या किंमतीबद्दल अधीक माहीती देण्यासाठी कंमेंट्स दील्या जातात. एका सेल मधुन दुसर्‍या सेल मध्ये फक्त कंमेंट्स कॉपी करावयाच्या असतील तर Comments या पर्यायाचा वापर करा.


Validation
Only data validation rules are pasted.

दीलेल्या सेल्समध्ये फक्त ठरावीक प्रकारेच शब्द किंवा संख्याच लिहिता याव्यात यासाठी Validation वापरतात. उदाहरणार्थ एखाद्या सेल मध्ये फक्त पुर्णांक लिहिण्यासच परवानगी दीलेली असल्यास त्यामध्ये अपुर्णांक किंवा अक्षरे लिहिता येत नाहीत. यालाच वॅलीडेशन रुल्स असे म्हणतात. फक्त हे रुल कॉपी करण्यासाठी पेस्ट स्पेशल मधील Validation या पर्यायाचा वापर करता येतो.

All Except Borders
Everything will be copied and pasted from the original cell except borders of the cell.

All Except Borders म्हणजेच कॉपी केलेल्या सेल्स मधील बॉर्डर्स (किनार) वगळुन इतर डाटा तसाच्या तसा पेस्ट करणे.


Column Widths
The width of one column will be copied to another column.

एखाद्या कॉलमच्या रुंदी इतकीच दुसर्‍या कॉलमची रुंदी करण्यासाठी Column Widths या पर्यायाचा वापर करता येतो.

Formulas and Number Formats
The formula and the formatting of the original cell is copied and pasted.

मुळ सेल मधील फॉर्म्युला व फॉर्मॅटींग एकत्र कॉपी करण्यासाठी Formulas and Number Formats या पर्यायाचा वापर करा.

Values and Number Formats
Only the value and the formatting of the original cell is copied and pasted.

मुळ सेल मधील किंमत व फॉर्मॅटींग एकत्र कॉपी करण्यासाठी Values and Number Formats या पर्यायाचा वापर करा.

Operation
Specifies which mathematical operation ( like none, add, sustract, multiply, divide) you want to apply to the copied cells.

ऑपरेशन या पर्यायाचा वापर करुन बेरीज, वजाबाकी , गुणाकार, भागाकार अशा गणीती पद्धती एकत्र करता येतात. एका उदाहरणाच्या सहाय्याने हे समजावता येइल.

समजा A1 ते A10 मध्ये अनुक्रमे १ ते १० आकडे लेहीलेले आहेत. या सर्व आकड्यांना जर दहा ने गुणायचे असेल तर कोणत्याही एका सेल मध्ये ( A1 ते A10 सोडुन) १० लिहुन त्या सेलला कॉपी करुन घ्यावे , A1 ते A10 ला सीलेक्ट करुन पेस्ट स्पेशल मधील multiply हा पर्याय वापरुन कॉपी करावे. आता A1 ते A10 मधील किंमती १०,२०,३०...१०० अशा बदललेल्या असतील.

याचप्रकारे बेरीज , वजाबाकी आणि भागाकार असे इतर प्रकार देखील वापरता येतील.

Skip Blanks
Avoids replacing values in paste area when blank cells occur in the copy area.

समजा A1 ते A10 मध्ये अनुक्रमे १,२,३,४,५,६,७,८,९,१० अशा किंमती आहेत आणि B1 ते B10 मध्ये १०,१२,१५,रीकामी जागा, ४०,रीकामी जागा,रीकामी जागा, ८०,५०,२० अशा किंमती आहेत. जर A1 ते A10 मधील किंमती B1 ते B10 मध्ये पेस्ट करावयाच्या असतील परंतु B1 ते B10 मधील रीकाम्या जागा रीकाम्याच ठेवायच्या असतील तर Skip Blanks या पर्यायाचा वापर करा.

आता B1 ते B10 मध्ये पुढील किंमती दीसु लागतील - १,२,३,रीकामी जागा, ५,रीकामी जागा, रीकामी जागा५,८,९,१०

Transpose
Changes the columns of copied data to rows, and vice versa.

कॉलम्स मध्ये लिहिलेली माहीती रो (Row) मध्ये किंवा रो मध्ये लिहिलेली माहीती कॉलम्स (Coloumns) मध्ये रुपांतरीत करायची असेल तर Transpose
या पर्यायाचा वापर करा.

"Paste Special" feature in MS Excel. "Paste Special" feature in MS Excel. Reviewed by Salil Chaudhary on 03:24 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.