Why we raise our voice when we get angry?

[ ENGLISH/ MARATHI ].......

एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, " आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?". सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो."

यावर साधुमहाराज म्हणाले, " पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो. जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरीदेखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो". यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत्तर दीले. ते म्हणाले , " जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात."

A saint asked his disciples,'Why do we shout in anger? Why do people shout at each other when they are upset?'Disciples thought for a while, one of them said,'Because we lose our calm, we shout for that.''But, why to shout when the other person is just next to you?' asked the saint.'Isn't it possible to speak to him or her with a soft voice?Why do you shout at a person when you're angry?'

Disciples gave some other answers but none satisfied the saint.Finally he explained, 'When two people are angry at each other, their hearts distance a lot. To cover that distance they must shout to be able to hear each other. The angrier they are, the stronger they will have to shout to hear each other through that great distance.'

"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?" असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले," कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते.

आणि जसजसे दोन व्यक्तीमधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.

शिकवण - मित्रहो, परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतच राहतात मात्र कीतीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका. तसे होउ दील्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही.

Then the saint asked, 'What happens when two people fall in love? They don't shout at each other but talk softly, why? Because their hearts are very close. The distance between them is very small...'

The saint continued, 'When they love each other even more, what happens? They do not speak, only whisper and they get even closer to each other in their love.Finally hey even need not whisper, they only look at each other and that's all.That is how close two people are when they love each other.

MORAL:
When you argue do not let your hearts get distant, do not say words that distance each other more, else there will come a day when the distance is so great that you will not find the path to return. So learn how to love your partner... and all those around you, even the not so friendly neighbour...take care & God bless..

Source Unknown, Taken from a forwarded E-mail

Why we raise our voice when we get angry? Why we raise our voice when we get angry? Reviewed by Salil Chaudhary on 07:15 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.