Windows Live Planet - Microsoft's social networking site for Indian youth !

[ ENGLISH / MARATHI].......

गुगलवर कुरघोडी करण्यासाठी बाजारात आणलेल्या बिंग्.कॉम या सर्च इंजीनच्या यशानंतर आता मायक्रोसॉफ्टच्या भारतीय शाखेने एक सोशल नेटवर्कींग साइट चालु केली आहे. (ऑर्कुटशी चार हात करण्यासाठी ही साईट चालु केली आहे हे तुम्ही ओळखले असेलच!). मायक्रोसॉफ्टच्या या नविन साईटचे नाव आहे विंडोज लाइव्ह प्लॅनेट. ही साईट मुख्यत्वे १८ ते २५ वयोगटातील भारतीय तरुणांसाठी डीझाइन करण्यात आली आहे.

माझ्या मते आता सोशल नेटवर्कींग साइट्सच्या भाउगर्दीत नविन साईट्सना फारसा वाव नाही उरला आहे. मात्र इंटरनेटच्या या जगात कोण कधी आणि कशी बाजी मारेल ते सांगता येत नाही. बिंग यशस्वी होइल असे कोणालाच वाटले नव्हते मात्र केवळ २-३ महीन्यातच बिंगने याहु सर्चला मागे टाकत दुसर्‍या स्थानावर उडी घेतली आहे.

विंडोज लाइव्ह प्लॅनेट मध्ये नविन काय पहायला मिळणार?

  • भारतीय नेटीझन्स म्हणजेच आपण इंटरनेटवर काम करताना बराचसा वेळ सोशल नेटवर्कींग साईट्स वर घालवतो. मात्र इंटरनेटवर एखाद्या अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना त्या व्यक्तीला आपल्याशी मैत्री करण्यास स्वारस्य आहे की नाही, याबाबत मात्र आपल्याला काहीच माहीती नसते. विंडोज लाइव्ह प्लॅनेटने यावर उपाय म्हणुन मॅच मीटर (Match Meter ) ची सुविधा पुरवीली आहे. हा मॅच मीटर आपल्या प्रोफाइलशी मिळतेजुळते प्रोफाइल्स आपोआप शोधुन देतो.
  • विंडोज लाइव्ह प्लॅनेटवर मेसेंजर वेब बार आहे , याच्या सहाय्याने आपण मित्रांसोबत लाइव्ह चॅटींग करु शकतो.
  • तुमच्या कडे आधीपासुन विंडोज लाइव्ह, हॉटमेल किंवा एमएसएन अकाउंट असेल तर तुम्हाला विंडोज लाइव्ह प्लॅनेटवर सहजगत्या प्रवेश करता येइल आणि जीमेल किंवा याहु इमेलच्या सहाय्याने नविन अकाउंट उघडता येइल.
  • या साईटचा चेहरामोहरा अगदी तरुणाइला आवडेल असाच आहे.

विंडोज लाइव्ह प्लॅनेटच्या यशाअपयशावर इतक्या लवकर भाष्य करणे तसे अनुचीत ठरेल मात्र एक गोष्ट मी सांगु शकतो की आम्ही भारतीय ऑर्कुटवर प्रेम करतो त्यामुळे दुसर्‍या कोणत्या सोशल साइटकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

------------------------------------------------------------------------------------------------

After successfully launching a search engine called Bing.com to compete search major Google worldwide, now Microsoft India has launched a social networking site (No guesses, it's for competing Orkut !) Windows Live Planet. This site is designed specially for Indian youth in the age group of 18 to 25 years.

I personally think that Social networking space has become bit crowded and it's too late to enter in Social networking business. But you never know, looking at success of twitter and bing anything is possible in the world og internet wars.

What is unique in Windows Live Planet?

  • People in India spend a lot of time on social networks looking out for building new connections. But most of the time they are not sure whether the profile they are visiting will be interested to have new friends. Hence, they have introduced a new feature called Match Meter which automatically suggests profiles who can be your friends

  • The website uses the Messenger Web Bar, where users can chat with their Windows Live contacts.

  • Users can sign in to WindowsLivePlanet.com using their Windows Live, Hotmail or MSN account or else can use their Gmail, Yahoo or other email ids to create a new account.

  • Look and feel of the site is great and attractive. It is exactly what you need to have for attracting young crowd.

Here are some screenshots of Windows Live Planet -

It's too early to comment on it's success or failure .but one thing I can tell you, we Indians are known for our loyalty and as far as I know, we are loyal to ORKUT !

Windows Live Planet - Microsoft's social networking site for Indian youth ! Windows Live Planet - Microsoft's social networking site for Indian youth ! Reviewed by Salil Chaudhary on 07:12 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.