Add music to your blog (Blogspot)

[ MARATHI ].......

आपल्या ब्लॉगवाचकांना आपले आवडते गाणे ऐकवता अले तर? हो तुमचा ब्लॉग (किंवा वेबसाईट) चालु केल्यावर तुमचे आवडते गाणे आपोआप चालु होइल अशी सोय तुम्हाला ब्लॉगमध्ये करता येते आणि आज मी त्याबाबतच माहीती देणार आहे.

ब्लॉगच्या विषयाला अनुसरुन एखादे गाणे किंवा संगीत चालु करता येते. ब्लॉगवरील वाचकांना हा एक नविन अनुभव ठरेल. मात्र प्रत्येक वाचकाला ब्लॉग वाचताना असे गाणे आवडेलच असे नाही (जर ऑफीसमध्ये कोणी इंटरनेट सर्फींग करत असेल आणि अचानक गाणे वाजले तर कसे वाटेल?) म्हणुनच असे ब्लॉगसाँग चालु करावे अथवा नाही हे वाचकांना नियंत्रीत करता यायला हवे. (माझ्या ब्लॉगवरील गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा)

ब्लॉगसाँग (सोयीसाठी मी यास 'ब्लॉगसाँग' असे संबोधत आहे) चालु करण्यासाठी काय करावे याचे सवीस्तर विवचन खालीलप्रमाणे -

१. यासाठी तुमचे आवडते गाणे किंवा संगीत आधी कोणत्यातरी वेबहोस्टींग साईटवर अपलोड करणे आवश्यक असते. तुम्ही गुगल पेज क्रीएटरचे सभासद असाल तर हे काम अतीशय सोपे आहे. गुगल पेज क्रीएटर मध्ये फाइल्स अपलोड करण्याची सोय आहे. येथे तुमचे आवडते गाणे अपलोड करा व त्याची वेबलिंक कॉपी करुन घ्या.

(टीप - गुगल पेज क्रीएटर मध्ये नविन खाते उघडता येत नाही, नुकतीच गुगलने ही सुविधा बंद केलेली आहे. ज्यांचे येथे आधीपासुन खाते आहे ते मात्र ही सुविधा वापरु शकतात. असे असली तरी चिंता करण्याचे कारण नाही. तुमच्याकडे गुगल पेज क्रीएटर अकाउंट नसेल तर जे गाणे तुम्हाला अपलोड करावयाचे असेल ते मला salil@netbhet.com या इमेल पत्त्यावर मेल करा. मी ते गाणे मोफत अपलोड करुन गाण्याची वेबलिंक परत इमेल द्वारे पाठवेन)

शक्यतो .mp3 फॉर्मॅट वापरु नका. गाणे wav किंवा mid फॉर्मॅटमध्ये असल्यास अधीक चांगले. फायरफॉक्स ब्राउजर वापरणार्‍यांना .mp3 फॉर्मॅट ऐकु यावा यासाठी काही स्क्रीप्टस डाउनलोड कराव्या लागतात. (गाण्याचा फॉर्मॅट बदलण्यासाठी येथे क्लिक करा)

२. आता अपलोड केलेल्या गाण्याची वेबलिंक तुमच्या ब्लॉग मध्ये कशी टाकावी ते पाहुया.

ब्लॉगर म्हणजेच ब्लॉगस्पॉट ब्लॉगमध्ये ADD HTML/ JAVA SCRIPT या नावाचे एक गॅजेट असते. (Dashboard -- Layout -- Add a Gadget -- HTML/ javascript ). या गॅजेटमध्ये खालील कोड कॉपी करा.

वरील कोडमध्ये http://salilchaudhary.googlepages.com/titanic2.wav ही वेबलिंक काढुन त्याजागी तुम्ही बनवीलेली वेबलिंक कॉपी करा.

३. ब्लॉग Layout सेव्ह करा.

आता तुमच्या ब्लॉगला भेट देणार्‍या वाचकांना एक म्युझीक कन्सोल दीसेल.(चित्र पहा). त्यामधील प्ले (Start) बटण दाबल्यास वाचकांना गाणे ऐकु येइल (अर्थात त्यांसाठी त्यांचा स्पीकर चालु असायला हवा !)वरील कोड मध्ये आपापल्या आवश्यकतेनुसार काही बदल करता येतात -

  • autostart="false" याचा अर्थ वाचकांनी start बटणाने चालु केल्याखेरीज गाणे चालु होणार नाही. ब्लॉगवर आल्यानंतर लगेचच गाणे सुरु करावयाचे असल्यास false च्या जागी true असे लिहावे.
  • loop="true" याचा अर्थ गाणे संपलानंतर परत पुन्हा चालु होइल. मात्र गाणे एकदा वाजुन थांबावे यासाठी true च्या जागी false असे लिहावे.
  • ब्लॉगच्या आकारानुसार म्युझीक कंसोलचा आकार बदलण्यासाठी height="40" आणि width="200" यामध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करावा.

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Add music to your blog (Blogspot) Add music to your blog (Blogspot) Reviewed by Salil Chaudhary on 17:48 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.