Convert image to text - ASCII Art

[ MARATHI ].......

काही वर्षांपुर्वी मी टीव्हीवर एका कलाकाराबद्दल बातमी पाहीली होती. त्या कलाकाराने टाइपरायटर वरील अक्षरांच्या सहाय्याने चित्रे काढली होती. महात्मा गांधी, सचिन तेंडुलकर, शिवाजी राजे अशा अशी अनेक व्यक्तीचित्रे त्याने काढली होती. अतीशय अचंबीत करणारा प्रकार होता तो.

त्या कलाकाराने अशी चित्रे काढताना प्रचंड मेहनत घेतली असणार यात शंका नाही. खुपच वेळखाउ, आणि बारकाइचे काम आहे हे. पुढे कळलं की या प्रकारालाच अ‍ॅस्की आर्ट (ASCII - A-American S-Standard C-Code for. I-Information I-Interchange) असे म्हणतात.

आज मला एक अशी वेबसाइट सापडली आहे जी अशी चित्रे अगदी काही सेकंदात बनवुन देते. या वेबसाईटचे नाव आहे photo2text.com. (फोटोटूटेक्स्ट्.कॉम).
या वेबसाईटवर Browse बटणाच्या सहाय्याने तुमच्या कंप्युटरमधील कोणतेही चित्र (जास्तीत जास्त १ MB पर्यंत) अपलोड करा आणि मग Submit बटण दाबुन त्याची अ‍ॅस्की इमेज तयार करा.

या चित्राला नाव देउन ते संगणकावर .txt या फॉर्मॅट मध्ये सेव्ह करता येते त्याचप्रमाणे याची एक वेबलिंक ही बनवीली जाते जी तुम्ही मित्रांबरोबर शेअर करु शकता.

यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसते.

Visit - photo2text.com
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.


Convert image to text - ASCII Art Convert image to text - ASCII Art Reviewed by Salil Chaudhary on 19:38 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.