Creative, Crazy and Funny home repairs :-)

[ MARATHI ].......
मी नेटभेट वर बर्‍याच वेळा क्रीएटीव्हीटी बद्दल बोलतो. क्रीएटीव्हीटी म्हणजे फक्त कलाकुसर किंवा महागातील स्पेशल टूल्स वापरुन केलेले आविष्कार असेच नसते तर रोजच्या जीवनातील अडचणी साध्या सोप्या सहज उपलब्ध होणार्‍या स्वस्त वस्तु हुशारीने वापरुन सोडवणे म्हणजे देखील क्रीएटीव्हीटीचाच प्रकार असतो.

एक इंजीनीअर असल्याने मला अशा प्रकारच्या उपायांचे प्रचंड आकर्षण आहे. मी देखील लहानपणापासुन असाच 'जुगाडु' आहे. ('जुगाड' हा अशा क्लृप्त्यांसाठी वापरला जाणारा हिंदी शब्द आहे. यासाठी उचीत मराठी शब्द मला काही केल्या आठवला नाही, तुम्हाला ठाउक असेल तर प्लीज सांगा)

असेच काही जुगाड मला thereifixedit.com या वेबसाईट वर पहायला मिळाले. खुप आवडले आणि म्हणुनच नेटभेटच्या वाचकांशी शेअर करावीशी वाटली.

बरेच जण आता गणपती निमित्त गावी जाणार असतील तेथे जरा चहुबाजुला नीट पहा. असे अनेक अस्सल गावठी 'जुगाड' दीसतील.

लहानपणी वाचलेली एक म्हण मला आता खर्‍या अर्थाने उमजली - 'गरज ही शोधाची जननी आहे'. :-)

Visit - thereifixedit.com
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Creative, Crazy and Funny home repairs :-) Creative, Crazy and Funny home repairs :-) Reviewed by Salil Chaudhary on 11:43 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.