Most inspirational videos ever! - Part 2

[ MARATHI ].......


गेल्या आठवड्यात मी नेटभेटच्या वाचकांना एका स्फुर्तीदायी व्हीडीओ बद्दल सांगीतले होते. मला खात्री आहे की तो व्हीडीओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. आज मी वाचकांना आणखी दोन व्हीडीओज बद्दल सांगणार आहे नव्हे दाखवणार आहे.

यापैकी पहीला व्हीडीओ टाइम्स ऑफ ईंडीयाच्या "लीड ईंडीया" या कँपेनसाठी २००७ साली बनवण्यात आला होता. या व्हीडीओ बद्दल मी जास्त काहीही सांगणार नाही कारण माझ्या मते हा व्हीडीओ सर्व शब्दांच्या पलीकडचा आहे. तो पुर्ण पाहण्यातच खरी मजा आहे.दुसरा व्हीडीओ ही कॅडबरी कंपनीची एक जाहीरात आहे. कॅडबरी चॉकलेट्स मध्ये काही वर्षापुर्वी अळ्या(warms) सापडल्या होत्या. कॅडबरीच्या पॅकींगमध्ये काहीतरी दोष आढळुन आला होता. कंपनीने तत्परतेने या तक्रारींवर पाउल उचलुन विक्रमी वेळेत नवी पॅकींग बाजारात आणली होती. त्यावेळी कंपनीने ही जाहीरात दाखवीली होती.

जगातील सर्व महान व्यक्तींनाही कधीकाळी अपयशाला सामोरे जावे लागले होते. पण त्यानंतरही मागे न हटता त्यांनी आपापली उद्दीष्टे साध्य केलीच आणि यातच त्यांची खरी महानता आहे.

हा संदेश देणारी ही जाहीरात अतीशय स्फुर्तीदायी आहे.उद्या सोमवार आहे. या व्हीडीओ क्लिप्स पाहुन नविन आठवड्याची सुरुवात जोमाने करा. मला तुमचा प्रतीसाद नक्की कळवा.
(वरील व्हीडीओ क्लिप्स तुम्हाला डाउनलोड करायची असल्यास खाली कमेंट्स मध्ये तुमचा इमेल आयडी देण्यास विसरु नका.)

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

Most inspirational videos ever! - Part 2 Most inspirational videos ever! - Part 2 Reviewed by Salil Chaudhary on 10:39 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.