आय अ‍ॅम ऑलवेज कनेक्टेड !

[ MARATHI ].......

नेटभेटवर मी नेहमीच उत्तमोत्तम आणि मोफत मिळणार्‍या वेब अप्लिकेशन्स बद्दल माहीती देत असतो. पैसे खर्चायला लावणार्‍या पेड (Paid) सर्वीसेसबद्दल मी सहसा येथे सांगत नाही. मात्र आज एका अशा वेबअप्लिकेशन बद्दल माहीती देणार आहे जे वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतात. खरेतर या अप्लिकेशनची उपयुक्तता लक्षात घेता त्यांनी आकारलेले दर अगदीच नाममात्र वाटतात.

या वेब अप्लिकेशनचे नाव आहे mobee.in. ही वेब साइट भारतीय असुन बँगलोर येथुन चालवीली जाते.

आता सांगतो mobee.in काय काम करते ते.

आजच्या युगाला माहीतीचे युग म्हणतात. ज्याच्याकडे योग्य माहीती योग्य वेळी पोहोचते तो यशस्वी होतो. म्हणुनच कनेक्टेड राहण्याला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

मोबाइल्सने कनेक्टीव्हीटीचा प्रॉब्लेम बराचसा सोडवला आहे. संगणकच हातावर सामावण्याची क्षमता असलेले मोबाइल्स बाजरात येत आहेत. GPRS चा वापर करुन मोबाइलवरच इंटरनेट वापरता येतो. इ-मेल्स वाचता येतात आणि पाठवता येतात.

मात्र असे मोबाइल्स घेणे सर्वांनाच शक्य होते असे नाही. अशा सर्वांसाठीच mobee.in उपयोगी ठरते. तुमच्या ई-मेल बॉक्समधुन ठरावीक किंवा सर्वच ई-मेल्स SMS च्या स्वरुपात मोबाइलवर पाठवण्याची सोय mobee.in उपलब्ध करुन देते.

मोबी.इन चे काही मुख्य फायदे -

  1. SMS द्वारे पुर्ण ईमेल वाचता येते. (full access to your emails via SMS)
  2. कोणतेही सॉफ्टवेअर इंन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही तसेच GPRS ची आवश्यकता नाही. no GPRS required and nothing to install
  3. जीमेल, याहू, आउटलूक यांसारख्या सर्व मुख्य ईमेल जीमेल, याहू, आउटलूक यांसारख्या सर्व मुख्य ईमेल सर्वीसेसवर तसेच कोणत्याही मोबाइलवर ही सुविधा काम करते.works with any email - Outlook,Gmail,Yahoo etc & on any mobile
  4. ४८० अक्षरांपर्यंतच्या इमेल्स मोबाईलवर मिळवता येतात. receive email beyond SMS limit(160 chars) - upto 480 chars
  5. पुर्ण इमेल वाचता येते त्याचप्रमाणे REPLY, REPLYALL, SEND देखील वापरता येते. READ full mail, REPLY, REPLYALL, SEND email
  6. ईमेल पाठवताना किंवा उत्तर देताना त्यासोबत अ‍ॅटॅचमेंट पाठवता येईल. attach documents while SENDing or REPLYing emails
  7. एकापेक्षा अधिक ईमेल अकाउंटसबरोबर ही सुविधा वापरता येते. access unlimited email accounts
  8. एखाद्या ई-मेलद्वारे येणार्‍या ईमेल्स ब्लॉक किंवा अनब्लॉक करता येतात. BLOCK and UNBLOCK emails from a email Id
  9. तुम्हाला पाठवण्यात आलेल्या SMS चा बॅकअप घेउन सुरक्षीत ठेवता येतात. BACKUP your SMS

Mobee.in कसे वापरावे?

१. 919845498454 या मोबाइलवर SIGNUP असा SMS पाठवा.

२. आता तुम्हाला एक वेलकम मेसेज आणि एक अकाउंट कंनफर्मेशन मेसेज पाठवीला जाईल.


३. तुमच्या ई-मेल अकाउंट मध्ये जाउन खालील प्रमाणे फॉरवर्डींग सेट करा.

४. काही निवडक ई-मेल्स फॉरवर्ड करायचे असतील तर तसे मेसेजेस फिल्टर करुन घ्या.

५. तुमच्या ई-मेल्स आता मोबाइलवर SMS स्वरुपात पाठवण्यात येतील.

६. START किंवा STOP असा SMS करुन ही सेवा कधीही बंद किंवा चालु करता येते.मोबी.इन वर रजीस्ट्रेशन करा आणि मग दीमाखात सगळ्यांना सांगा "आय अ‍ॅम ऑलवेज कनेक्टेड !"
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

आय अ‍ॅम ऑलवेज कनेक्टेड ! आय अ‍ॅम ऑलवेज कनेक्टेड ! Reviewed by Salil Chaudhary on 11:34 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.