"बीअर्"ची छत्री !

[ MARATHI ].......

"नेटभेट"वर क्रीएटीव्हीटीबद्दल लिहिताना माझ्या मनात नेहमी संमीश्र भावना असतात. मी वाचकांना खुप अफलातुन क्रीएटीव्ह गोष्ट दाखवतोय याचा आनंद मनात दाटलेला असतो आणि त्याच वेळी "अरे, ही कल्पना मला का नाही सुचली ? या विचाराने स्वतःवरच राग येतो.

आजचा लेख लिहिताना देखील अशीच स्थीती आहे. खरंतर दुसर्‍याच एका विषयावर आज लिहिणार होतो पण आजच आलेल्या एका ई-मेल मध्ये मला हा विषय सापडला आणि लगेचंच त्यावर लिहायला सुरुवात केली.

आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रॉडक्टचं नाव आहे "पॅरासोल" (Parasole). पॅरासोल म्हणजे छत्री. होय हे कमालीचे प्रॉडक्ट एक छत्री आहे. पण ही साधी सुधी छत्री नाही तर "बीअर्"ची छत्री आहे. परदेशांत (जिथे बीअर पाण्यासारखी पिली जाते!) बीचवर किंवा स्वीमींगपुल मध्ये मजेत पडुन राहुन बीअरचा आनंद घेणे हा रवीवारची सुट्टी घालवण्याचा नित्यनेमच असतो. अशा ग्राहकांना लक्षात घेउनच ही बीअरची छत्री बनवीली गेली आहे.

रबराच्या चकतीसारख्या बीअरच्या या छत्रीचे मुख्य दोन फायदे आहेत -

१. ही रबरी चकती बीअरवर बसवल्यावर छत्रीप्रमाणे काम करते आणि सुर्याच्या उनापासुन संरक्षण देत बीअरला जास्तीत जास्त थंड ठेवते.

२. या छत्रीबरोबर बीअर पाण्यात ठेवली तर ती तरंगत राहते. त्यामुळे दोनही मोकळे ठेवुन आरामात बीअरचा आनंद घेता येतो.साल्वा क्वीअल्स पॅलान्का आणि व्हीक्टर सालरॉट (salva quiles palanca and victor salort) या स्पेअनच्या डीझाइनर्सनी पॅरासोल हे प्रॉडक्ट एका बीअर कंपनीसाठी डीझाइन केले आहे.

आपल्या आजुबाजुला असणार्‍या साध्या साध्या गोष्टींकडे/प्रश्नांकडे जरा डोळसपणे पाहीले तर असे कित्येक क्रीएटीव्ह उपाय आपल्याला सापडतील. गरज आहे ते फक्त शोधण्याची !

स्त्रोत (Source) - Designboom

Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

"बीअर्"ची छत्री ! "बीअर्"ची छत्री ! Reviewed by Salil Chaudhary on 07:44 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.