गुगल काकांच्या होमपेजची कथा !

[ MARATHI ].......

दिवसभरात अनेक वेळा आपण गुगल.कॉम वापरतो. गुगलचे नीटनेटके पांढरेशुभ्र होमपेज पाहील्याशिवाय खचितच कुणा नेटीझनचा दिवस पार पडत असेल्.(याहु कींवा मायक्रोसॉफ्टचे कर्मचारी सोडुन!)
पण आज सर्वांचे आवडते असणारे गुगलचे हे होमपेज मात्र गुगलच्या सुरुवातीच्या काळात इंटरनेट वापरणार्‍यांना बुचकळ्यात टाकणारे होते. कारण सुरुवातीला उपलब्ध असणार्‍या सर्च इंजिन्सचा बाज काहीसा वेङळा होता. भरपुर चित्रे, बातम्या आणि जाहीरातींच्या भाउगर्दीत हरवलेला सर्च बॉक्स अशाच वेबसाईट्स पाहण्याची त्यांना सवय होती.

गंमत म्हणजे गुगलचे होमपेज इतके स्वच्छ ठेवायचे असे काही आधीपासुनच ठरलेले नव्हते. गुगलच्या प्रमोटर्सना म्हणजेच लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना HTML चे फारसे ज्ञान नव्हते.त्यांना फक्त त्यांच्या डेटाबेस सॉफ्टवेअरसाठी एक साधा इंटरफेस पाहीजे होता. आश्चर्याची बाब म्हणजे पहील्या गुगलपेजवर फक्त गुगलचा लोगो आणि सर्च बॉक्स या दोनच गोष्टी होत्या. आणि आता आपण वापरतो तसे "शोधा" किंवा "submit" बटणही नव्हते. त्यासाठी "एंटर" बटण दाबावे लागत असे.

सुरुवातीला जेव्हा गुगलची चाचणी चालु होती तेव्हा वापरकर्ते गुगल्.कॉम टाइप करुन फक्त स्क्रीनकडे बघत रहायचे. चाचणी घेणार्‍यांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी त्याबद्दल विचारणा केली.यावर उत्तर आले की "लोगोच फक्त लोड झालाय, बाकी पान लोड व्हायची आम्ही वाट पाहतोय"
हा प्रश्न सोडवण्यासाठी नंतर गुगलने कॉपीराइट लिंक दाखवण्यास सुरुवात केली. (कॉपीराईट मेसेज आला म्हणजे पेज पुर्णपणे लोड झाले असा त्याचा अर्थ !)

इतर सर्व सर्च इंजिन्सचं आता रंगीबेरंगी वेबपोर्टल्स मध्ये रुपांतर झालयं पण तरीही गुगलच्या होमपेजमध्ये फारसा बदल झालेला नाही. नुकतच गुगलला त्यांच्या होमपेजचे पेटंट मिळवण्यात यश आले.२००४ मध्ये यासाठी अप्लिकेशन करण्यात आले होते तब्बल पाच वर्षांनंतर गुगलला हे पेटंट मिळाले.
Get NETBHET straight in your inbox / आता नेटभेट मिळवा थेट इमेल द्वारे

Enter your email address / खालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.

गुगल काकांच्या होमपेजची कथा ! गुगल काकांच्या होमपेजची कथा ! Reviewed by Salil Chaudhary on 18:20 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.